Browse all the articles of Dr Satilal Patil
सुपंथ ! मित्रांनो रसायननामा या मालिकेतील हा शेवटचा भाग. आज उत्पादक, विक्रेता, शासन आणि शेतकरी यांच्या सम्यक सहभागाबद्दल बोलूया. मला एक प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे तेलंगणामधून एक कीटकनाशक उत्पादक आला. म्हणाला ‘साब मेरे पास एकदम स्ट्रॉंग प्रोडक्ट है, उससे किडा मिंटो मे नीचे गिरता है’.मी त्याला वचारलं की आपण सक्रिय घटक कुठले वापरता?, यावर त्याने […]
रासायनिक कीटकनाशकांच्या निर्मितीपासून ते निर्माल्यापर्यंतच्या प्रवासावर टाकलेला प्रकाश. गेल्या महिन्यात केरळ हायकोर्टाने शबरीमाला मंदिर ट्रस्टला ते भक्तांना वाटत असलेला प्रसाद न वाटण्याचे आदेश दिले. असं काय झालं की कोर्टाला देवाचा प्रसाद थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. त्याचं झालं असं की एका एफएसएसआई प्रमाणित प्रयोगशाळेने शबरीमाला मंदिरातील प्रसादाचे नमुने तपासले. तपासाअंती हा प्रसाद विषारी असल्याचं दिसून आलं. […]
जैविक असो किंवा रासायनिक, कीटकनाशकाची बाटली आपल्यापर्यंत कशी पोहोचते? याचा प्रवास आजच्या लेखात पाहूया. आपल्या शेतात, बागेत वापरत असलेलं कीटकनाशक आपल्या बंधाशी येईपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून पार पडतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. डिलरच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकाचा जन्म उत्पादकाच्या/उद्योजकाच्या प्रयोगशाळेत किंवा फॅक्टरीत होतो. सक्रिय घटक बनवून त्याचे फॉर्मूलेशन म्हणजे सुत्रीकरण केले जाते. मग सुरु होते […]
आपल्याला कहाणीमध्ये लै रस असतो. मग ती शेजार(नी)च्या घरातील असो की टीव्ही मधल्या डेलीसोप मालिकांमधली. मग आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग बनलेल्या शेतीरासायनांची कहाणी जाणून घेण्यात तुम्हाला नक्की रस असेल हे गृहीत धरून आजचा लेख लिहितोय. आपल्याला ज्ञात असलेला कीटकनाशकांचा इतिहास, ख्रिस्तपूर्व २००० वर्षे मागे जातो. साधारणतः साडेचार हजार वर्षापूर्वी प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये सल्फरचा कीडनियंत्रणात […]
Urban pests are any insects, rodents, or other animals that live in or near people’s homes and buildings in cities. Common urban pests include cockroaches, ants, bed bugs, flies, rodents, spiders, and more. These pests can cause health and sanitation issues, as well as damage to property and homes. Fortunately, there are many pest control […]
या आठवड्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स रिसर्च प्रयोगशाळेत, संशोधकांनी सकारात्मक बातमी दिली. त्यांनी घोषित केलं की त्यांनी अणूंची एकत्रीकरण अभिक्रिया यशस्वी केली असून त्यातून त्यांना जास्तीची ऊर्जा मिळाली. या बातमीने संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला. जगभरातल्या प्रसिद्धीमाध्यमांनी याची दाखल घेतली. आण्विक विकिरण शास्त्राची प्रथमावस्था १८९५ ते १९४५ च्या काळात होती. त्यात शेवटचे सहा वर्षे महत्वाचे […]
गेल्या महिन्यात फिलिपीन्सची राजधानी मनिला मध्ये एका विशेष बाळाचा जन्म झाला. हे बाळ स्पेशल यासाठी, की त्याच्या जन्माने जगाची लोकसंख्या आठशे कोटी झाली. आठशे कोटी म्हणजे आठवर मारुतीच्या शेपटीगत नऊ शून्य ठेवल्यावर जी संख्या होईल ती. माणूस या गर्दीत कसा पोहोचला? आफ्रिकेत लावलेला ‘होमो-सेपियनचा’ वंशवेलु जगभर कसा फोफावला हे जाणून घेऊया. माणसाने लोकसंख्येची शतक कशी […]
अहो, घरात झुरळं खूप झालीयेत, पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवावं लागेल? बायको म्हणाली आणि घरफवारणीवाल्याला मी फोन लावला. दुसऱ्या दिवशी तो आला. आम्हाला सर्व भांडीकुंडी बाजूला काढून ठेवायला सांगितली. जादूगाराने आपल्या पिशवीतून सामान काढावं तसं लेबल नसलेल्या बाटल्या, झुरळांची जेलची डबी, फवारयाचा पंप अश्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. औषध पंपात टाकून घरभर भरगच्चं फवारल. किचन मध्ये […]
अंगकोरवाट म्हणजेच कंबोडियाच्या सांस्कृतिक राजधानीतून सायकलिंग करत आम्ही थायलंडमध्ये प्रवेश केला होता. उत्तर थायलंडच्या रॅनॉन्ग या शहरात आम्ही पोहोचलो. दिवसभरच्या पायडलपीटीने जरा दमछाक झाली होती. संध्याकाळची वेळ होती. शॉवर घेतला आणि खाण्यासाठी एखादं चांगलं हॉटेल मिळतं का हे शोधायला बाहेर पडलो. थोड्या शोधाअंती लहानसं, स्वच्छ असं रेस्टारंट मिळालं. छोट्याश्या हिरव्यागार टेकडीवजा उंचवट्यावर ते दिमाखात बसलं […]
जेव्हा मी पहिल्यांदा भारताबाहेर गेलो तेव्हा एका गोष्टीने माझी गोची केली होती, आणि ते म्हणजे तिथल्या संडासात नसलेले पाण्याचे जेट फ्लॅश. विमानतळ, हॉटेल, सार्वजनिक संडास, अगदी सगळीकडे बिनपाण्याचा कार्यक्रम होता. पाण्याची जागा घेत टॉयलेट पेपरचा रोल प्रत्येक ठिकाणी लटकत होता. ही लोकं असं उष्ट्या अंगाने दिवसभर कशी राहत असतील? याचं किळसदृश्य आश्चर्य मला वाटायचं. माझ्या […]
मित्रो! असं म्हणत पंतप्रधानांनी, लॉकडाऊन होण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला दिला आणि मला शेतातल्या घरात महिनाभर राहण्याचा योग आला. या महिन्याभरात गरजा कमी असल्यास किती कमी पैशात महिना घालवता येतो, याची प्रचिती आली. पेपर, टीव्ही, हॉटेलमध्ये खाणे, पेट्रोल-डिझेल, सिनेमा, शॉपिंग यासारखे कोणतेच खर्च नाहीत. अगदी शुल्लक खर्चात सहाजणांच्या कुटुंबाचा महिनाभराचा चरितार्थ भागाला. मी विचार करू लागलो आयुष्य […]
पप्पु आज लै खुशीत होता. गुणगुणतच ऑफिसला आला. काय रे पप्पू, लै खुशीत दिसतोस? वाहिनी गावाला गेल्या की काय? त्याला मिश्किल विचारणा केली. नाही हो, आज ऑफिसला येतांना कावळ्याची विष्ठा अंगावर पडली. ते शुभ असतं ना. आजचा सकाळीसकाळी शुभशकुन मिळालं. एका कावळ्याने पप्पूचा दिवस शुभ केला होता. दुसऱ्या दिवशी देखील तसंच घडलं. तेव्हा त्याला म्हटलं […]
‘लै फडफड करतोय हा पाकिस्तान, एक अणुबॉम्ब टाकून संपून टाकायला पाहिजे याला’ माझा एक मित्र तावातावाने बोलत होता. विषय नेहमीप्रमाणे ‘भारत आणि पाकिस्तान’ हा होता. ‘तो रशिया बघा, अमेरिका युरोपची पर्वा न करता, कसा वाघासारखा घुसलाय युक्रेनमध्ये, आपली लोकसंख्या तर रशियापेक्षा दहा पटीने जास्त आहे, आपण कशाला घाबरायचं’ अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला मित्र फुल जोशात […]
लहानपणीचं कुतूहल स्वस्थ बसू द्यायचं नाही. माणूस कसा बनला? माकडापासून तो हुबेहूब आपल्यासारखा कसा दिसू लागला? आपल्या ग्रहावर पहिला जीव कोणता? तो कुठून आला? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात घेऊन मी फिरायचो. काही प्रश्नांची उत्तरे मिळायची, काहींची नाही. त्या काळी इंटरनेट नसल्याने गुगल बाईला विचारायची सोय नव्हती. पुढे पुस्तकांनी त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली […]
आटपाट कळपात ‘टिंगी’ नावाची लहानगी गोंडस मेंढी राहत होती. छोटीशी पांढऱ्याशुभ्र लोकरीची ‘टिंगी’ तिच्या कुटुंबासोबत जंगलातील मेंढ्यांच्या कळपात राहायची. हा कळप डोंगराच्या कड्याशी, माळरानावरील पंचवीसतीस एकरावरील कुंपणात वसला होता. या कळपाचा मेंढपाळ सहृदयी आणि मेंढ्यांची काळजी घेणारा म्हणून मेंढीजगतात प्रसिद्ध होता. त्याच्या कळपात शंभर-सव्वाशे मेंढ्या होत्या. वडिलोपार्जित मेंढ्यांपासून बनलेला हा कळप तो मोठ्या चतुराईने सांभाळत […]
घरातून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे, अंगणात बसून पुस्तकात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटूचे लक्ष विचलित झाले. पुस्तक बाजूला ठेऊन तो घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे वडील आणि काकांचे भांडण सुरु होते. त्याचे वडील कुशा कदम आणि काका दादू कदम, या सख्ख्या भावांचे भांडण जुंपले होते. या दोघांना वेगळं व्हायचं होतं. एकोप्याने राहणाऱ्या कदम कुटुंबाला घरात सुना आल्यावर वाटणीचे […]
आज रविवार. सुट्टीचा दिवस. शेतातील घरासमोर बसलो होतो. मोबाईल जवळ नसल्याने, दर पाचदहा मिनिटाला काहीतरी हरवलंय असं वाटून हात उगाचच खिसे चाचपायचे. मग मेंदूने, मोबाईल आपण घरात ठेवलाय! अशी आठवण करून दिल्यावर हात पुढच्या पाचसहा मिनिटासाठी शांत व्हायचे. डोक्यातले विचारांचे किडे वळवळत होते. तेवड्यात एक मुंगी माझ्या पायावर चढली. मी नकळत तिला झटकली. हा झटका […]
प्रसंग: पहिला स्थळ: डोंगरातील गुहा. काळ: आदि (मानवाचा) काळ वेळ: आदीपहाट आदिमानवाचं बाळ: ‘पोट दुखतंय!’ आदीआई: ‘बाळा आज नदीपलीकडच्या जंगलात जाऊया जेवायला. तिकडे ते लांब पानाचं झाड आहे ना, ते खाल्लं की होईल पोट बरं’. आईने बाळाला पाचसहा किलोमीटर दूर नदीपलीकडच्या जंगलात कडे नेलं. हिंस्र प्राण्यांपासून स्वतःला वाचवत, झाडावरून, डोंगरकड्यावरून उड्या मारत, पोहत दोघं नदीपलीकडे […]
हॅलो मित्रा, कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं. अरे, इकडे गेले काही दिवस जाम उकडत होतं. डोंगराला पाझर फुटावा तसे घामाचे झरे वाहत होते. तापमानाने तर जणू नवनवीन रेकॉर्ड करायचा चंग बांधला होता. सूर्याचा […]
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सायकल वरच्या प्रभातफेरीला निघालो. आज रविवार असल्याने जरा लांबचा पल्ला गाठणार होतो. मावळातल्या खेड्यापाड्यातून सकाळी सकाळी सायकल चालवायचा आनंद काही वेगळाच आहे. मंदिराच्या घंटानादाशी जुगलबंदी करणारा बैलांच्या गळ्यातला घंटेचा आवाज. थंड हवेवर पसरलेला गोठ्यातील गोमुत्राचा गंध. अश्या वातावरणात सायकल चालवायचा आनंद काही औरच. अंगणात पहाटेची झाडलोट सुरु होती. एवढ्यात, अश्या सुरेल सकाळी (बे)सूर […]
मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच, वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं. कहाणीतील डिटेक्टीव्हने खुन्याला पकडला की, त्याची कॉलर पकडून […]
गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा […]
सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. कोणत्या देशाने कोणाची बाजू घ्यावी यासाठी तोडपाणी, गटबाजी याला ऊत आलाय. लहानसहान देशांना आपल्या कंपूत ओढून घेण्यासाठी मोठ्यांची धावपळ सुरु आहे. रशिया कसा जागतिक खलनायक आहे, हे ‘सौ चुहे खाऊन हजला निघालेला’ अमेरिकन भोंगा ओरडून सांगतोय. या गदारोळात, युद्धाच्या आगीवर भाजलेली चिनी पोळी, रशिया-युक्रेनच्या टाळूवरील लोण्यासह चीन एन्जॉय […]
आटपाट गावात धोंडिबा नावाचा तरुण शेतकरी राहत होता. धोंडिबाचं घर नदीच्या या काठाला तर शेत नदीच्या दुसऱ्या काठाला होतं. पूर्वी नदीला बारमाही पाणी असायचं त्यामुळे घरातून नजरेच्या टप्प्यात असलेल्या नदीपल्याडच्या शेतात जाण्यासाठी, लांबच्या पुलापर्यंत पायपीट करत, पुलावरून नदी ओलांडून शेतात जावं लागायचं. पण गेल्या दोन दशकात पर्जन्यचक्राचा समतोल ढळला. पावसाचं चालचलन बिघडलं. वर्षभर नेमाने वाहणारी […]
ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने ‘कुटूर कुटूर’ असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते. कातरलेल्या सुपारीची, शार्पनरने पेन्सिलीची निघते तशी नक्षीदार पापडी, कात-चुना लावलेल्या रंगीत पानावर पडत होती. ‘काय झालं सुनबाई?’ असं ताडकन उठत अप्पानी विचारलं. ‘अहो अप्पा’ s […]
भाग-६: बळीचं राज्य! शाम ने आजची कामं जरा घाईनेच उरकली. शेतातून जरा लवकर परत आला. संध्याकाळी मित्रांच्या गप्पांच्या मैफिलीलादेखील न जाता तो सरळ घरी आला. ‘आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला म्हणायचं’ त्याची आईने हसत विचारलं. यावर ‘अगं आई, उद्या तालुक्याच्या गावाला जायचंय. पावसाळा तोंडावर आलाय. रेंगाळलेल्या कामांची यादी साचलीय, ती संपवतो आधी’. शाम उत्तराला. शयाम […]
भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे रावसाहेबांना कळेना. त्यांनी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला पण ग्लानी आल्यासारखी झाली आणि पुन्हा डोळे मिटले गेले. मग मिटल्या डोळ्यांनी त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण […]
भाग-४: अनर्थ आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील […]
भाग-३: बिस्किटचा पुडा सदा एक साधा, सरळ नाकासमोर चालणारा शेतकरी होता. गाठीला पाच एकरचा सुपीक, बागायती वडिलोपार्जित जमीनीचा तुकडा होता. दावणीला खिलार बैलांची जोडी आणि दाराशी दुधातुपासाठी गायम्हैसीची घंटा वाजत रहायची. सदा प्रामाणिकपणे शेतात राबवायचा. यामध्ये त्याला त्याच्या बायकोची पूर्ण साथ मिळायची. सदाच्या घरात पाळणा हालला. पहिली मुलगी झाली. सदा मात्र नाराज होता. त्याला वंशाला […]
भाग-१: तंटा(मुक्ती) जितुदादा हा गावातील तरुणांचा नेता. वडिलोपार्जित वीस एकर शेती. दावणीला गाय, बैल असा पारंपरिक पसारा. जुनं ते सोनं असतं असं म्हणत, आजोबांनी, वडिलांना आणि वडिलांनी जितुदादाला सांगितलेल्या मार्गावर मनोभावे ते शेतीत राबत राहिलेत. जितुदादा तसा मेहेनती. दिवसभर मनापासून शेतात राबायचं आणि संध्याकाळी मित्रांच्या घोळक्यात, पारावार गप्पांचा फड रंगवायचा हा वर्षानुवर्षांचा दिनक्रम. **************************************** देशमुखांचा […]
भाग-१: तंटा(मुक्ती) कथा-१… भारत आणि पाकिस्थांची फाळणी झाली. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या भावाभावांची ताटातूट व्हावी तसा, एक देश दोन भागात विभागाला गेला. फोडा आणि राज्य करा ही नीतीला बळी पडलेले दोघेही. दोन शेजारी देश बनले. बांधाला बांध असलेले दोन्ही वेगळे झाले खरे, पण त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. पाकिस्थानाने खुसपट काढलं आणि भारताने त्याला धडा […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मित्रांनो, गेल्या वर्षभरापासून आपण एकत्र बाईकवरून ही आंतरराष्ट्रीय शेतशिवाराची फेरी मारतोय. तुम्हाला डबलसीट घेऊन मी भारतातून, भूतान, ब्रहमदेश, थायलंड, कंबोडिया, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत फेरफटका मारलाय. गेल्या ४९ भागाची ही सफर आज अर्धशतक गाठून संपत संपतेय. या सफरीदरम्यान आपण […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझ्या पुणे ते सिंगापूर या मोटारसायकलवरील मोहिमेच्या शेवटच्या देशात मी पोहोचलोय. सहा देशातील अनुभव घेऊन इथवर पोहोचलोय. इमिग्रेशन मधील कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून कायद्याने या चिमुकल्या देशात पाऊल ठेवले. माझ्या टायरचा स्पर्श सिंगापुरी देशाला व्हायचा अवकाश, इथल्या महिला […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ आज मलेशियातील शेवटचा दिवस आहे. येथील प्रवासादरम्यान मी आणि माझी बाईक वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतोय. तेल आणि टुरिझम बरोबरच शेतीने या देशाच्या विकासात हातभार लावलाय. मलेशियात पामच्या शेतीबरोबरच येथील बीफ, मासेमारी, फळबागा, रबराची शेतीही प्रसिद्ध आहे. जसा शेतीचा […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थंडगार हवेत लपेटलेली मलेशियन सकाळ. सीटवर पहुडलेल्या साखरझोपेतल्या दवबिंदूंना दूर सारत, बाईकवर मांड ठोकली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. दूरवरून हवेच्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या मंद संगीताचे सूर ऐकू येताहेत. समोर दिसणाऱ्या शेजारच्या गावातून ते येताहेत असं वाटतंय. दुरून […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझ्या बुलेटचे रबरी पाय मलेशियन रस्त्याला लागल्यापासून तिच्यातील कंपन संपलय असं वाटायला लागलय. रस्ते लोणी लावल्यागत चकाचक आहेत. रस्त्यावरील वाहनं लष्करी शिस्तीत धावताहेत. वाहनांचा वेग वाढलाय. माझ्या बुलेटपेक्षा, लहानसहान वाहने भरधाव वेगाने मला ओव्हरटेक करून, वाकुल्या दाखवत पुढे […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघालेली माझी बुलेट आणि मी, आता मलेशियात येऊन पोहोचलो आहोत. भारत, भूतान, ब्रह्मदेश, थायलंड आणि कंबोडिया असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत, माझ्या बुलेटचे टायर मलेशियाच्या गुळगुळीत रस्त्यांना गोंजारत सिंगापूरच्या दिशेने निघाले. एवढा लांबचा पल्ला पार करत, दर […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेले काही दिवस कंबोडियामध्ये बाईकने हिंडतोय. लहानसहान, गावं शहरातून जातान एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे इथला माणूस साधा आणि सरळ आहे. अगदी मनापासून तो परदेशी लोकांना, प्रवाश्यांना मदत करतांना दिसतो. भाषेच्या बाबतीत देखील जास्त गोंधळ नाहीये. यांची खमेर […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 30 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघून आम्हाला आता जवळपास महिनाभर झालाय. इतके दिवस बाईक चालवत, हजारो किलोमीटरचे रस्ते तुडवत आम्ही कंबोडियाला पोहोचलो आहोत. आमची मोहीम सुरु झाली तेव्हा भारतात दिवाळी सुरु होती. गावागावात दिव्यांचा सण साजरा होत असतांना, आम्ही सात देशांच्या सफरीवर दिवे […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बुरशीच्या रोगांमुळे दरवर्षी पिकांचे भरपूर नुकसान होते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशके वापरतो. ही बुरशीनाशके कशी वापरावी याबाबतीत आज माहिती घेऊया. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुरशीचा रोग दिसण्या आगोदर फवारणी करायला हवी. बुरशीचे नियंत्रण करायला जी औषधे वापरतात त्यांना बुरशीनाशके […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 16 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारताशी सांस्कृतिक भावकी असणाऱ्या देशात बाईकने फिरतोय. थायलंड आणि व्हिएतनाम अश्या दोन दमदार अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये गरीब कंबोडियाचं सॅन्डविच झालंय. पण निसर्गाने या देशाला भरभरुन दिलंय. अमेरिकेबरोबरच्या युद्धात मानवाने या सौंदर्याला ओरबाडायचा प्रयत्न केला खरा. ती जखम जवळजवळ […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 9 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ माझी कंबोडियाची बाईक राईड जोरात सुरु आहे. इथल्या खेड्यापाड्यात फिरतांना आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा अभिमान लोकांमध्ये जागोजागी जाणवतो. त्याचबरोबर व्हिएतनाम युद्धाची अमेरिकन झळ आणि स्वदेशी कुपुत्र पोलपॉट ने दिलेला घाव लोकांच्या आठवणीत ताजा आहे याची जाणीव होते. पण फक्त […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 03 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पूर्वी नवीन कीटक नाशकाची ट्रायल घायची असल्यास, त्या प्रॉडक्टचे लहान बाटल्यातले नमुने आम्ही शेतकऱ्यांना द्यायचो. ४-५ शेतकऱ्यांच्या शेतात ट्रायल घ्यायचा कार्यक्रम असायचा. शेतकऱ्याच्या उपस्थितीत औषध शेतात फवारायचो. दररोज निरीक्षण करा आणि आम्हाला रिझल्ट सांगा असं बजावून आम्ही परतायचो. […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 02 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ कंबोडियाची अमेरिकेबरोबरच्या युद्धात झालेली फरफट आणि त्यानंतर त्यांचा भूमिपुत्र ‘पोल पॉट’ ने दिलेला घाव या देशाच्या उरी लागला होता. पुढचे कित्तेक वर्षे त्यांना या धक्क्यातून सावरायला लागले. अजूनही हा देश त्या दुःस्वप्नातुन सावरतोय. भूतकाळाची भुतं कोणत्या ना कोणत्या […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बहुतेक वेळा आपण वेगवेगळे प्रॉडक्ट एकत्र फवारतो. या खिचडी फवाऱ्यामुळे पिकावर स्कॉर्चिंग येत. स्कॉर्चिंग म्हणजे काय? हा प्रश्न आपल्यातील काहींना पडला असेल. स्कॉर्चिंग मध्ये झाडाच्या अंगावर डाग पडतो किंवा ते सुकते. पिकाच्या पानावर, फुलावर, फळावर किंवा इतर कोणत्याही भागावरील […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पोलपॉटने बरबाद केलेल्या देशात बाईकने फिरतांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवताहेत. व्हिएतनाम युध्दमुळे त्यांच्या देशाचं झालेलं नुकसान आणि त्यामुळे जन्माला आलेला ‘खमेर रुज’ चा अत्याचार, लोकांच्या मनात घर करून राहिलाय. खरं तर हे युद्ध व्हिएतनाम मध्ये होत. पण व्हिएत काँगचे […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भगवान विष्णूच्या या देशात मी आणि माझी बाईक फिरतोय. ‘अंगकोर वाट’ मंदिराचं दर्शन घेतल्यापासून, भारतीय नाळ जुळलेल्या या देशाबद्दल भावकीची आपुलकी निर्माण झालीय. इथं फिरतांना ३०-४० वर्षापूर्वीच्या भारतात फिरल्याचा भास होतोय. हा देश तसा गरीब आहे. शहरातील लोकांची परिस्थिती […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 15 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ ज्यांच्याकडे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था आहे त्यांच्यासाठी पाणी मातीमोल आहे. ते प्रमाणापेक्षा जास्त पाणी देताहेत. जास्त पाण्यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसानही होतेय, पण कोरडवाहु शेतकऱ्यांसाठी या पाण्याची किंमत डोळ्यातील पाण्याएवढी आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, ज्याच्याकडे मुबलक अन्न आहे तो अती खाल्ल्यामुळे […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ कंबोडियाचा सूर्य उठण्याआगोदर मी जागा झालो. आजच्या दिवसाची प्रचंड उत्सुकता ओसंडून वाहतेय. पोटात एक अनामिक संवेदना उठली. आनंद, उत्सुकता असंच काही बाही… त्या संवेदनेचं अनालिसिस करायचा प्रयत्न करतोय पण नक्की काय होतंय ते कळत नाहीये. लहानपणी शेजारच्या गावात […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधील प्रवास आज संपलाये . माझी बाईक थायलंड- कंबोडियाच्या बॉर्डरवर उभी आहे. थायलंडच्या हिरव्यागार भूमीला सॅल्यूट ठोकला आणि बॉर्डर चेक पोस्टकडे निघालो. सीमेवरील कागदोपत्री सोपस्कार आटोपून कंबोडियाच्या धूळभरल्या भूमीला माझ्या बाईकचं काळंभोर टायर टेकलं. कंबोडियाला खमेर भाषेत कंपूचीया असंही […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ शेतीचा हंगाम सुरु झाला की शेतीरासायनांच्या विषबाधेच्या बातम्या ऐकायला मिळतात. शेतीरासायने वापरतांना काळजी न घेतल्याने हे अपघात घडतात. काहींना गंभीर इजा होते तर काहीजणांना जीवदेखील गमवावा लागतो. शेतीरासायने विषारी असतात हे सगळ्यांना माहित असून देखील या घटना घडतात. एखादा […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 28 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ आज जेवणात थाई करी आणि भाताचा बेत आहे. पण जेवणात म्हणावी तशी मजा येत नाहीये. गेल्या काही दिवसात, येथील रासायनिक शेतीची माहिती कळल्यापासून, प्रत्येक पदार्थात रसायनं वळवळतांना दिसताहेत. येवढा सुंदर देश रसायनांच्या विळख्यात अडकून ‘उडता थायलंड’ झाल्याचा भास होतोय. […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 21 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बराच वेळ गाडी चालवतोय. पोटात काहीतरी टाकूयात म्हणून मघापासून उपहारगृह शोधतोय. पण मिळत नाहीये. गावं अगदीच छोटी आहेत. त्यामुळे हॉटेल दिसत नाहीयेत. शेवटी किराणा मालाच्या दुकानात ब्रेड, चॉकलेट वगैरे मिळतं का पहावं म्हणून आत घुसलो. दुकानात शोधक नजर फिरत […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 14 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ दक्षिण-पूर्व थायलंड मधून माझा बाईक प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे दाटीवाटीने वर्षावनात उभी आहेत. थायलंड हा वर्षवनांचा प्रदेश. इथं मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे जंगलं माजतात. हिरव्या छत्रीखाली इतर लहानसहान झाडे, झुडपे,वेली, परजीवी वनस्पती फोफावतात. या वर्षावनांतून प्रवास […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 07 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या पूर्वेकडील भागातून प्रवास सुरु आहे. सामूत सखोम प्रदेशातून माझी बाईक दिमाखात निघालीय. नाजूक थाई रस्त्याला बाईकचे टायर गुदगुल्या करत पळताहेत. राजधानीचं शहर बँगकॉकपासून हा भाग सत्तर ऐंशी किलोमीटर दूर असेल. पण वातावरणात जमीन अस्मानाचा फरक आहे. गगनचुंबी […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 01 August, 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ लहानपणा पासून एका दगडात दोन पक्षी मारण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. मग ती शिकवण आपण एवढी गंभीरपणे घेतो की एका दगडात एकच काय पण एकापेक्षा जास्त पक्षी मारायचा प्रयत्न करतो. त्या शिकवणीचाच परिणाम आहे की काय, पण शेतात औषधे फवारतांना […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 31 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पावसाची रिपरिप सुरु होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो, न चुकता हजर होतोय. इथलं वातावरण तसं दमट आहे. त्यामुळे दुपारी सूर्य डोक्यावर आला की उकडतं आणि त्याने पश्चिमेच्या पलंगावर अंग टाकलं की थंड वाऱ्याचा […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बाजारात पीएच बॅलन्सर म्हणजे सामू सुधारक उत्पादनांची भरमार दिसते. पण हे सामू सुधारक म्हणजे आहेत तरी काय आणि त्यांची का गरज पाडावी? हे जाणून घेण्याअगोदर आपण पीएच म्हणजेच सामू म्हणजे काय हे घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखादा पदार्थ […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर माझा प्रवास सुरु आहे. आज बराच प्रवास झालाय. पोटात काहीतरी टाकूया म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो. कॉफी बरोबर खायला काय आहे हे शोधू लागलो. मला काय हवंय हे हॉटेलवाल्या थाई बाईला, न सांगताच समजलं आणि […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 23 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेल्या काही दिवसात युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचे बळी गेले आहेत. अचानक आलेल्या पूरसंकटामुळे युरोपियन देशात हाहाकार माजलाय. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जीयम, इटली, लक्सम्बर्ग, नेदरलँड, स्वित्झर्लंड, युके या देशांना पुराचा फटका बसलाय. पण जर्मनीत सर्वात जास्त […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 23 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेल्या काही दिवसात युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचे बळी गेले आहेत. अचानक आलेल्या पूरसंकटामुळे युरोपियन देशात हाहाकार माजलाय. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जीयम, इटली, लक्सम्बर्ग, नेदरलँड, स्वित्झर्लंड, युके या देशांना पुराचा फटका बसलाय. पण जर्मनीत सर्वात जास्त […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 17 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ झिंगूर म्हणजेच क्रिकेटची चव चाखून पहिली. झिंगूर बरोबरच, बांबूतल्या अळ्या, रेशीम किड्याच्या अळ्या, पाम विव्हिलच्या अळ्या, नाकतोडा, पाणभुंगा हे किडे थाईलंडमध्ये खाल्ले जातात. त्यातील झिंगूर, नागतोडे यांचं शेतीला जोडधंदा म्हणून संगोपन केलं जातं, तर काही किडे सरळ जंगलातून […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मागच्या लेखात आपण फवारा साहाय्यकाची माहिती घेतली. आज फवारा साहाय्यक कुळातील ‘स्प्रेडर’ या प्रकारची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिले स्प्रेडर ची गरज का पडावी? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी किडे पानाच्या मागील बाजूस राहणे पसंत करतात. […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 10 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पटायाच्या झगमगीत रस्त्यावरून आमच्या बाईक या सदाहरित शहरात प्रवेश करत्या झाल्या. रात्र जागवणारं हे शहर देशविदेशातील पर्यटकांनी फुललेलं आहे. हॉटेलवर बाईक लावून, बाजारात चक्कर मारायला निघालो. सूर्य पश्चिमेच्या समुद्रात बुडाला होता. जीवाचं थायलंड करायला आलेले निशाचर, रस्त्यावर गर्दी करायला […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ आज जर आपण शेतीऔषधांच्या दुकानात गेलो, तर कीटकनाशकांपेक्षा टॉनिक, झाईम, स्प्रेडर, स्टिकर यासारख्या, मसाला प्रॉडक्टच्या रंगीबेरंगी, चमचमत्या, बाटल्यांनी दुकान भरल्याचे दिसते. कीडरोग नियंत्रणात मेन हिरो, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक हे आहेत. पण त्यापेक्षा या इतर सहकलाकार प्रॉडक्टची गर्दी, शेतीऔषधात […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 03 July, 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ सकाळची कोवळी हवा अंगावर मोरपीस फिरवतेय. सर्व गाड्या एका लयीत चालताहेत. बॅंकॉक अब दूर नही, असं वाटतंय. गुळगुळीत थाई रस्त्यावर, सलग दोन तास कशी गाडी चालवली, हे कळलंच नाही. रस्त्याच्या कडेला चहानाश्ता मारला. त्या हॉटेलजवळ हत्ती आणि घोड्याचे […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थाकसिन विद्यापीठातील चर्चा आता रंगलीय. अजून एक गरमागरम ‘ग्रीन टी’ चा कप समोर आला. प्राध्यापक महोदयांनी माझ्या चहाच्या कपात एक साखरेचा चौकोन टाकत, अजून साखर हवीय का? अश्या बारीक प्रश्नार्थक नजरेनरेने पाहिलं. मी ‘अजून नकोय, धन्यवाद’ असा […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 June , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मागच्या लेखात आपण गोचीड कुटुंबाचा इतिहास आणि वंशावळीबाबत माहिती घेतली. या लेखात आपण गोचीडा बद्दलचे गैरसमज आणि नियंत्रणाबद्दल जाणून घेऊया. लोकांमध्ये या कुप्रसिद्ध किड्याबद्दल बरेच गोचीडसमज आहेत. त्यातील तथ्ये जरा जाणून घेऊयात. पहिला गैरसमज म्हणजे, गोचीड हा, आसमान से […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 19 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ ठाकसीन विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबरची चर्चा रंगात आलीये. माझ्या अधाशी प्रश्नांच्या भडिमाराला ते उत्साहात उत्तरं देतायेत. थायलंडमधील, शेती, शेतकरी, समाज, समाजकारण अश्या विविध विषयांच्या स्टेशनवर थांबत आमची गाडी शेतमजुरावर येऊन थांबली. ‘तुमच्या देशात, शेतमजुरांची मजुरी किती असते?’ असं […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 June , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ शेतकरी आणि पाळीव प्राण्यांच्या मालकात सध्या गोचीड ही मोठी डोकेदुखी ठरलीय. मेडिकलच्या दुकानातून गोचीडाच्या औषधा बरोबरच शेतकरी, डोकेदुखीच्या गोळ्या पण खरेदी करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ह्या लेखमालेतून मी गोचीड आणि त्याचे नियंत्रण ह्यावर उजेड पडणार आहे. […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 12 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ रस्त्यावरचे गिचमिड थाई फलक वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न करत माझा दुचाकी प्रवास सुरु आहे. ‘सुरत थानी’ नावाचं गाव, लांब कुठंतरी आहे, असं रस्त्यावरचा चुकार इंग्रजी फलक ओरडून सांगतोय. ‘सुरत थानी’ हे मोठं गाव असावं. कारण रस्त्यावर त्याच्या […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधल्या हिरव्यागार दिवसांचा आणि चमचमत्या रात्रीचा आनंद घेत बुलेट प्रवास सुरु आहे. सुकुमार नितळ त्वचेवर, सुगंधी तेलाचा मुलायम मसाजी हात फिरवा तसे बाईकचे टायर गुळगुळीत रस्त्याला गुदगुल्या करत धावताहेत. थाईलंडमधली लोकं आपल्या देशाएवढीच मानाने स्वच्छ आणि सुंदर […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पाऊस बदाबदा कोसळतोय. पावसाच्या थेंबांचा टपटपाट हेल्मेटच्या काचेवर एकसारखा सुरु आहे. नखशिकांत भिजलोय. पावसाचं पाणी शरीराच्या कान्याकोपऱ्यात थंडी घेऊन घुसलंय. पावसाला चिरत बुलेट निघालीय. थंडगार वारा पावसाशी युती करत, थंडीला पार नसानसात भिनवतोय. ‘बस्स झालं हे पावसाची […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 22 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ दूरवर उंच इमारत दिसतेय. आजूबाजूच्या घरांच्या मानाने ती सोनेरी पांढरी इमारत बरीच उंच आहे. जरा जवळ गेल्यावर तिचा विचित्र आकार नजरेत भरला. तो चक्क कोंबड्याचा भला मोठा पुतळा होता. मोठा म्हणजे किती मोठा असावा? 3-4 मजली इमारतीएवढा […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 15 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बाइकिंगचा स्वर्गीय आनंद घेत प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या पिकांचे मळे, जंगलं, खाड्या ओलांडत रास्ता अवखळ मुलागत बेलगाम पळतोय. मधूनच तो डोंगरघाटात चढतो, पुढच्या घडीला उतारावरून झोकून देत थेट समुद्रकाठी बीचवरील वाळूसोबत मस्ती करत […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 08 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बुलेट धकधकत निवांत निघालीय. रस्त्यावर नजर ठेवून इतरत्र झाडं, पक्षी, प्राणी, आजूबाजूची घरं, गावं, लोकं यासारख्या चर-आचर निसर्गाचा आनंद घेत प्रवास करतोय. रस्त्यानं जाताजाता माझ्या या दुरदृष्टीने लांबूनच काहीतरी वेगळं दृश्य हेरलं. एका […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 01 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमार ची सीमा ओलांडून आमच्या बुलेटी थायलंडच्या रस्त्याला लागल्या आणी चॅनल बदलावं तसं चित्र बदललं. सुबक प्रशस्त रस्ते, नजर जाईल तिथपर्यंत हिवंगार जंगलं आणि शेती. सगळीकडे कशी मस्तपैकी स्वच्छता आणी टापटीप. लोकांच्या चेहऱ्यावरून सतत झिरपणारं स्मित हास्य […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 April, 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ सकाळच्या कोवळ्या उन्हात डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात बसून नाश्ता आटोपला. नाश्त्याचा ठिकाण म्हणजे छोटंसं अग्रोटुरिझम सेंटर होत. शेतात गवताने शाकारून बनवलेलं खोपटं. तेलाचा घाना, घरगुती गूळ बनवण्याचं लहानसं गुऱ्हाळ. आश्चर्य म्हणजे या गुळापासून इथं राजरोसपणे दारुही बनवली जातेय. असली दारुडी […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 17 April, 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बुलेटवरील बर्मीज सफर बहरात आलीय. येथील स्थानिक अन्नपदार्थांची चव चाखत, म्यानमारी पाहुणचार खात दिवस मजेत जाताहेत. प्रत्येक जेवणानंतर ग्रीन टी आग्रहाने पाजला जातोय. येथील जेवणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे रोजच्या जेवणात हिरव्या पानांचा, कडवट चवीचा एक […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 03 April, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ खराब रस्ते जाऊन चकाचक डांबरी रस्ते लागले. लोण्यासारख्या रस्त्यावर बुलेटचे टायर कॅरमच्या स्ट्रायकर प्रमाणे फिरु लागले. हा बदल एकदम कसा झाला हे कळेना. पण रस्त्यावरीन बोर्डने त्याच उत्तर दिलं. राजधानीचं शहर ‘न्यापीदाव’ जवळ येत होतं. म्यानमारची जुनी राजधानी […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ धूळभरल्या रस्त्यावर दुपारच्या जेवणासाठी थांबलो. ऊन बऱ्यापैकी होतं. हॉटेलात पाय ठेवल्याठेवल्या तेथील मुलीने हसून म्यानमारी भाषेत काहीतरी पुटपुटत हातावर गुळाचा खडा आणि तिळीचे दाणे ठेवले. त्यासोबत थंडगार पाण्याचा ग्लास हातात दिला. कदाचित ‘तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला’ म्हणाली […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ ब्रह्माच्या या देशातून माझ्या बुलेटरथातून हिंडतोय. वाऱ्याशी स्पर्धा करत माझा वारू उधळलाय. रस्त्याच्या दुतर्फा म्यानमारी पिकं पानांच्या टाळ्या वाजवत माझं स्वागत करताहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातून फिरताना पिकांची विविधता जाणवतेय. म्यानमार हा दक्षिणपूर्व आशियातील सर्वांत मोठा देश. एकूण जमीन […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ सकाळचा कोवळा सूर्य थायलंडच्या बाजूने आकाशात वर चढत म्यानमार वर सोनेरी झालर झळकवत होता. खेड्यापाड्यात लोकांची रोजच्या कामाची लगबग सुरु होती. गोल म्यानमारी टोपी घालून बायका, माणसं शेतकामाला निघाली होती. गुरांचा आवाज आणि त्यांच्या शेणमूत्राचा वास आसमंतात भरला […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमारच्या खेड्यापाड्यातून मी फिरत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला लुंगीवाले लोक फिरताना दिसत होते. गैरसमज करून घेऊ नका, म्यानमारचा राष्ट्रीय पोशाख लुंगी आहे. तामिळनाडूसारख्या पांढऱ्याशुभ्र लुंग्या नसतात इकडे. राजाबाबू सारख्या चांगल्या भडक, रंगीबेरंगी, चट्ट्यापट्ट्याच्या नक्षीदार लुंग्या नेसून लोक सगळीकडे फिरत […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 06 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ क्यू याम किम सी s s सर s s क्यू याम किम सी s s असं न समजणाऱ्या एलियन भाषेत रस्त्यावरच्या बायका ओरडत होत्या. कडेला बरीच गर्दी जमली होती. मी कुतूहलाने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काय प्रकार […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या म्हणजेच ब्रह्मदेश उर्फ म्यानमार च्या सीमेला जोडणारा तो पूल होता. सीमेवर ना […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भूतानमधून खाली उतरत उतरत परत भारतात आलोय. नागालँड मार्गे मणिपूरच सीमोल्लन्घन केलय. अगदी भूतान मधून निघाल्यापासून अधूनमधून डोंगरांच्या टोकाकडे जाणारी शेती लक्ष वेधून घेतेय. या प्रदेशात सपाट जमीन नाही. म्हणून दात कोरून पोट भरावं तस इथं लोकं डोंगर […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भूतान मधील आज शेवटचा दिवस. जाताजाता या देशासंबंधी जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. पंचेंद्रियांच्या सेन्सर मधून जेवढा भूतान माझ्यात सामावून घेता येईल तेवढा घेतोय. येथील मुक्त वातावरण मनावर गरुड घालतंय. ही मुक्तता भूतानच्या रक्तातच आहे, निसर्गाचं […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 06 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ हिमालयाला गोंजारून येणारा थंडगार वारा अंगावर घेत भुतानच्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही बुलेट पळवत होतो. वाऱ्याच्या जोडीने आजूबाजूच्या शेतातील पिके पानांच्या टाळ्या वाजवत परदेशी पाहुण्यांचं स्वागत करत होते.” भूक लागलीये यार, थांबूयात की जेवायला” असं म्हणत रस्त्याच्या बाजूच्या […]
Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 30 January, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेले दोन दिवस जगातल्या सर्वात आनंदी देशात बुलेटने फिरतोय. रस्ते एकदम चकाचक आहेत. कुठेही कचरा नाही, प्लास्टिक च्या पिशव्या, गुटख्याच्या पुड्या नाहीत. घरं, दुकानं मराठी शाळेतल्या आज्ञाधारक मुलांसारखे शिस्तीत उभे. कुठेही राजकारण्यांचा वाशीला लावून केलेलं अतिक्रमण नाही. […]