Dreamers and Doers

(24 customer reviews)

399.00

 • Language: Marathi
 • Binding: Paperback
 • Publisher: Green Vision
 • Genre: Adventure
 • ISBN: 978-81-947060-0-7

Amazon Link to Buy: Dreamers and Doers by Dr. Satilal Patil

Description

रोजच्या रहाटगाडग्यात पिसलेला तो एका बेसावध क्षणी जागो होतो. उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहतो. स्वप्नाला स्वप्न जोडत धाडसी स्वप्नाळूंची एक टोळी जमते आणि सुरु होतो स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा थरारक, रोमहर्षक प्रवास…

ड्रीमर्स अॅन्ड डूअर्स वाचताना आपण लेखकासोबत गाडीवर मागे बसून या प्रवासाचे भागीदार होतो. येतील ती आव्हानं वरदान म्हणून झेलतो, पेलतो, समृद्ध होतो. सात देशांचा इतिहास, भुगोल, वर्तमान, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण, अवस्था, व्यवस्था, राहणीमान, खानपान… याची देही याची डोळा अनुभवतो. आजूबाजूच्या जगण्याकडं डोळसपणे पाहत त्या त्या भागातील माणसांच माणूसपण काळजात साठवतो.

फिरण्याचा, जगण्याचा अन् जगाकडं पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन, नवी उर्मी, नवा आत्मविश्वास देणारं… स्वप्नपूर्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करणारं आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहीमांचे स्वप्न पाहणारांना उत्तम मार्गदर्शन करणारं आवर्जून वाचावं असं पुस्तक !

24 reviews for Dreamers and Doers

 1. Rithik

  नक्की वाचा

 2. Priyanka (verified owner)

  अप्रतिम प्रवास वर्णन

 3. Smriti (verified owner)

  चांगले पुस्तक. आश्चर्यकारक प्रवास. सुंदर वर्णन.

 4. Abhishek Chavhan (verified owner)

  खूप सुंदर पुस्तक. लेखकांसोबत आपण पण प्रवास करतोय असा अनुभव येतो. सगळ्यांनी नक्की वाचावे.

 5. Arvind More (verified owner)

  प्रत्येकजण स्वप्ने बघतो.. स्वप्न ही मुळात स्वमग्न अवस्था . बहुतांश वेळा ही स्वप्ने असतात गतकाळातील चांगल्या-वाईट क्षणांची , घडून कालातीत झालेल्या आठवांना पुन्हयांदा अंतर्मनांत आठवांची . खूप कमी लोक पुढील वाटचालींची स्वप्ने जोखतात, आणि त्याहूनही कमी लोक त्यांना प्रत्यक्षात आणायची स्वप्ने बघतात आणि सत्यात उतरवितात . अशीच एक व्यक्ती म्हणजे ‘सतीश ‘..डॉ . सतीश पाटील…शून्यातून…खूप काही उभारणार…स्वप्नातील वाटचाल, सत्यात साकारणारा एक किमयागार माणूस….. म्हटले तर एक साधारण व्यक्ती… दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कां… एक मेंदू असलेलाल…अगदी तुम्हा-आम्हासारखाच सर्वसामान्य माणूस…बस्स येथेच हे साम्य संपते. अतिशयोक्ती टाळूनही जे शब्द मला आठवतात ते म्हणजे…अनेक वर्तुळांना…त्यांच्या परिघांना छेदून स्वतःचे एक कर्तृत्व-तेजोमंडल ह्या माणसाने उभारलेय स्वतःचे. एका माणसाने आयुष्यात काय काय असावे…. सायंटिस्ट… उद्योजक…पर्यावरण स्नेही …सोशियालिस्त ….ऍडव्हेंचरर …. असंख्य मित्र-परिवार..अनेक उतरंडीवरचा …..खरा मुसाफिर…. आणि ह्या सगळ्या पोरावासाचा अनेक व्यक्तींसारखा मी ही एक साक्षीदार . माझा अनुभव असा कि…सतीश अगदी सहजपणे एखादी गोष्ट बोलून जातो.. कि असे…असे…करावयाचे योजले आहे… आपण अनुमोदन देतो आणि पुढे विसरूनही जातो आपल्या सो कॉल्ड जागायच्या ओढाताणीत …आणि एक दिवस मोकळ्या क्षणी फोन येतो सतीश चा….अजून एक स्वप्न सत्य झालेय….आपण आनंदी …आणि पठ्ठ्या अजून नवीन क्षितिजे धुंडाळायला सुरुवात करतो… कारण बहुधा फक्त त्यालाच कळलंय…क्षितीज म्हणजे एक काल्पनिक रेषां आहे…
  पुणे ते सिंगापोर….बाईक वरून… नुसता विचार करूनच छाती दडपायला होते… मात्र हि मुशाफिरी शब्दशः जागलीये सतीश आणि टीम . जेव्हा काही काळापूर्वी सतीशकडून हा संपूर्ण प्रवास शब्दबद्ध करून वाचकांसमोर मांडायची कल्पना ऐकली …तेव्हापासूनच उत्सुकता लागली होती… असे नव्हते कि मी ह्या प्रवास गोष्टी ऐकल्या नव्हत्या… पण जे होते ते तुकड्या…तुकड्यात…. आणि आपले पोट असे तुकड्यात थोडेच भरते…पूर्ण साग्रसंगीत ताट हवे. तो योग् आला ….पुणे ते सिंगापूर हा प्रवास प्रत्यक्षात अनुभवल्यासारखा वाचायला मिळाला… त्यावर कडी म्हणजे हा पठ्ठा…परत उलट टपाली ..सिंगापूर ते पुणे परत आला अर्थात बाईक वरून… वाचायला किती हि सोपे असले तरी ते तसे नाही… ह्याची पदोपदी प्रचिती येते पुस्तकात वावरतांना… सारे वर्णन इतके जिवंत आहे पुस्तकात…. सारे अनुभव, वाटचाल इतकी जिवंत वाटते की परकायाप्रवेश चा अनुभव येतो…. सोबत आपण बाईक वर आहोत असे जाणवत राहते… थ्रूआऊट द बुक . रस्त्यात आलेल्या असंख्य अडचणी …. बुलेट सारखी बाईक कित्येक वेळा टेम्पो मध्ये चढविणे… ओले दमात कपडे रस्ताभर अंगावर असणे… पोलिसांचा अनुभव….चित्रविचित्र खाणे…. स्काय डायविंग चा अनुभव…सारेच अचंबित करणारे… लेखनशैली इतकी सहज आणि सोपी आणि तरीही खिळवून ठेवणारी आहे… जागोजागी पेरलेली खुमासदार वाक्ये… सत्तीश च्या आजवरच्या वाटचालीतून त्याला गवसलेले जीवनाचे तत्वज्ञान सोप्या शब्दात मांडलेले… स्थळ-काळाची संक्षिप्त ओळख… आपण तिथेच आहोत्सू अशी जाणीव करून देणारी… केवळ नशिबाने अवघड जागी गवसणारे माणुसकीचे थांबे हि जाणीव करून देतात कि दैव हे धाडसाच्या हातात हात घालून असते. सतीश च्या टीम ला बाइक वाली…कधी भेटलो नाहीये…पण ह्या निमित्ताने त्यांना भेटलो…प्रत्यक्षात भेटायची उर्मी निर्माण झाली… दाद द्यावीशी वाटते ह्या सर्वांना ….त्यांच्या हिमती ला.
  पुस्तक मिळाल्यानंतर सतीश चा २-३ दा फोन आलेला… पुस्तक वाचून झालेय का म्हणून… त्याला काय सांगावे…कि पुस्तकात तो एकटा सिंगापूर मधून परत येतांना जेव्हा भारताच्या सीमेत दाखल झालेला… मी तिथेच पुस्तक वाचणे थांबविले होते…माझी हिम्मतच होत नव्हती पूढे जायची… काय कारण असावे!… मला माहित होते..पुढे काय वाढलेले आहे….आणि मी त्याला तयार होत नव्हतो.. सतीश चा फोने आला कि मी सांगायचो…कामामुळे आज वेळ नाही झाला…आज प्रयत्न करतो..उद्या वाचतो. परमेश्वराने माणसाला २ सर्वोत्कृष्ट वरदान दिलेत… पुढील भविष्य माहित नसण्याचा… आणि तरीही पुढे चालत राहण्याची हिम्मत… का वाचत नव्हतो…ते नाही सांगणार…ते वाचायला च हवे…कारण तेव्हा च कळते …फिनिक्स पक्षी राखेतून भरारी घेतो म्हणजे नेमके काय असते… शब्दातीत यश काय असते… आणि त्यासाठी किती सत्व -परीक्षेतून जावे लागते…
  पुढे सर्व छान झाले… अगदी पाहिल्यापेक्षाही उत्तम…. आणि त्यासाठी माझे वंदन जागृतीवहिनींना , सतीश च्या दुर्दम्य इच्छाशक्ती ला… संतोष सरोज यांना… मोहन जी राजेश जी यांना… या सर्वांमुळे आज सतिश नावाचा वटवृक्ष उभा आहे…फोफावतोय… अनेकजणांना सावली देतोय…पुढे जाण्याची प्रेरणा देतोय…
  ड्रिमर्स अँड डुअर्स हे पुस्तक प्रत्येका ने एकदा तरी वाचायला हवे . ह्याच पुस्तकात तुम्हाला त्या खराब डिकश्यनरी मिळण्याचा पत्ता मिळेल ज्यात ‘अशक्य ‘ हा शब्द नाहीये…
  अपूर्णत्व च माणसाला पूर्णत्वं शोधायची आस देते… आणि त्या पूर्णत्वाला पोहोचल्यावर आतल्या अजून एका अपूर्णत्वेची जाणीव होते… ह्याच पूर्ण-अपूर्णत्वा चा प्रवास म्हणजे हे ड्रिमर्स अँड डुअर्स हे पुस्तक.

  सलाम सतीश…आणि सर्व टीम .

 6. कुंजेश महाजन, शिरपुर,

  सतिश पुस्तक छान लिहिलंय तु मला प्रुफुल, सीमंतिनी यांच्या सारखे सुंदर वर्णन करता येणार नाही कदाचित. खरोखर शोले सिनेमा मधील जय विरू सारखे तुझ्या बरोबर मागं बसून सात देश फिरलो असे वाटते .त्यात तुझा झालेला अपघाताचा प्रसंग वाचून पोटात गोळा येतो , त्यानंतर इतरांनी दिलेली वागणूक ( त्यांच्यातील दाखविलेल्या संकुचित वृत्तीचे दर्शन) इतक्या भयानक घटने नंतर तु घेतलेली गरूडझेप , खरोखर तुझा मित्र असल्याचा अभिमान वाटतो 👍🏻😊😘😘

 7. Simantini Patil

  ड्रीमर्स अँड डूअर्स

  मार्च 2020 भारतातले पहिले लॉक डाऊन. कोरोनाच्या लाटेवर स्वार होऊन प्रवास करणारे अस्वस्थ जनमन… आणि त्यानंतर सुरु झालेल्या ऑनलाइन शाळा कॉलेजेस …सर्वच जगाची नव्याने ओळख करुन देण्यासाठीचा.. मानसिक आनापानाचा कालावधी आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन मोबाईल खरेदीचे नवीन स्वस्थ कारण. लेकीने मोबाईल साठी धरलेल्या लाडिक हट्टाला स्वतः चा मोबाईल सोपवून पूर्णविराम दिला आणि त्याचबरोबर मोबाईलशिवाय जगणे अशक्य आहे सध्या या भावनेलाही आव्हान दिले. आणि या काळातच हाती आले डॉ. सतीलाल पाटील यांचे ‘ड्रीमर्स अँड डूअर्स’
  Every great dream begins with a dreamer but these dreams are the seedlings of reality. अगदी असेच काहीसे.७ देश.. ५८ दिवस.. २०,००० किलोमिटर ची मोटारसायकल मोहीम.
  एरवी प्रवास वर्णन या पासून दूर पळणारी मी पण या पुस्तकाने गारूड घातलं मनावर आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्णही झाले.. वा वाचून पूर्ण न करता उठणे जमले नाही असे म्हणू यात ना.
  लेखकाची जिद्द.. वेगवेगळ्या लोकांमधे सहजपणे मिसळण्याचा स्वभाव.. काहीतरी नवे करण्याची आस सर्व काही सोपे बनवते. निरनिराळे देश.. प्रत्येक ठिकाणचे अन्न.. लोक .. भौगोलिक व स्वभाव विषयक वर्णने.. सर्वच खरोखर उत्तम. कुठेही रटाळपणा येणार नाही ही काळजी घेत केलेली रचना यामुळे पुस्तक वाचण्यास उद्युक्त करते हे नक्की.
  सर्व काही सुरळीत सुरू असतांनाच नियती कठोर हसते म्हणतात.. किंवा मग स्वतः चीच नजर लागते म्हणतात आपल्यालाच.. असेच काहीसे येथेही घडते हे सिद्ध करणारा लेखकाचा या मोहिमेदरम्यान चा अपघात.. आणि त्या पुनर्जन्म नंतरचा एक एक एक क्षण. . नव्याने बोटात पेन धरण्याची धडपड असू देत वा अपघाताने घायाळ डोळ्याने रस्त्यावर सरळपणे बाईक चालवण्याची धडपड असू देत… या सर्वातून प्रकर्षाने जाणवते ती लेखकाची पुन्हा उभे राहण्याची .. नियतीला वाकुल्या दाखवण्याची जिद्द.. आणि त्याचरोबरीने मनात भरते लेखकाच्या जागृत स्थानाची.. जागृतीची घर आणि उद्योग सांभाळून आपल्या साथीदाराला त्याच्या इच्छेनुसार जगू देण्याची धडपड आणि या द्वयीतला अतूट विश्वास.. ज्यामुळे जीवावर बेतले म्हणून मोहीम अपुरी राहते की काय असे वाटत असतानाच पुन्हा काही दिवसांनी त्याच मोहिमेला .. त्याच रस्त्यावर पाठवण्याची परवानगी देणे यासाठीची हिंमत आणी you can do it and can fight again ची पाठराखण.. त्यामुळे कमी वेळा पुस्तकात दिसलेली पण प्रत्येक वेळी लेखकाच्या लेखणीची ताकद झालेली ही जागृतीही तेव्हढीच लक्षात राहते आणि म. भां. च्या ओळींचा आधार घेवून..
  साऱ्या जगामध्ये जे.. काही विशेष आहे..
  माझी मिसेस आहे.. माझी मिसेस आहे..
  अशी एका साथीदाराने आपल्या अर्धांगिनी ला दिलेली पोच ही अपील करून जाते.. आणि हेच म्हणावेसे वाटते की जोपर्यंत घराघरांमध्ये अशा सावित्री संसाराची खिंड ठामपणे लढवत आहेत तोपर्यंत कुठल्याच सत्यवानाचा रस्ता नियती रोखू शकत नाही हे नक्की. खाकीतला संतोष सरोज असू देत वा केवळ भारतीय हाच एक धागा मनात धरून अंधाऱ्या रस्त्यावर मदत करणारी सेल्वी असू देत.. किकी हारा लू व कुटुंबीयांसोबत मेजवानी.. आसाममधील बंद दरम्यानची मिरवणूक .. नकारात्मक आणि सकारात्मक ‘मी ‘ चे मोहीम भर चालणारे दंद्व .. खरच अप्रतिम. जगण्याचा आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन हे पुस्तक देते. संग्रही ठेवावे असे एक पुस्तक.. एक प्रवास.. स्वप्नपूर्तीचा.

 8. Prafull Walhe (verified owner)

  प्रिय सतीश,

  १० नोव्हेंबर २०२० ला संध्याकाळी एक लिंक येते व्हाट्स अप वर ड्रीमर्स अँड डूअर्से 📖ह्या पुस्तकाची.

  लेखक डॉक्टर सतीलाल (सतीश) पाटील (आमचा सत्या ) !!

  नाव वाचून मी लगेच गुगल पे 💲 करून पुस्तक आरक्षित केल.

  व्हाट्स अप वर दिलेल्या नियमाप्रमाणे पुस्तक २२ नोव्हेंबर ला माझ्या घरी कुरियर ने आल.

  एक दिवस ते पुस्तक तसच टेबलावर होत आणि मग २४ नोव्हेंबर ला मी त्याला वाचायला सुरुवात केली.

  मित्रा मी एकदम भारावून च गेलो. आणि काही तरी लिहावं ✍️असं वाटायला लागल आणि माझे हात शिवशिवायला लागले तुझ्या सारखं एव्हडं शास्त्र शुद्ध तर मला नाही लिहिता येणार परंतु थोडा प्रयत्न करून थोडे लिखाण करतो आहे.

  तू जे काही लिखाण ह्या पुस्तकाद्वारे केले आहे ते इतके सुंदर आणि अफलातून असेल हे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

  मी आता पर्यंत बऱ्याच लेखकांची लिखाण वाचली आहेत जसे रणजित देसाई , पु. ल. देशपांडे , प्र. के. अत्रे, वि. दा. सावरकर, शिवाजी सावंत, शांता शेळके, राम गडकरी, वीणा गवाणकर, अच्युत गोडबोले, इ.

  मला वाचताना प्रकर्षणाने असं जाणवल कि हे एका शास्त्र शुद्ध लेखकाने लिहिलेले पुस्तक आहे.

  आणि खरं सांगू मला तुझा हेवा वाटला.

  पुस्तकातले प्रत्येक पाठ हा एवढ्या सुंदर 👌आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने रचला आहे कि वाचताना प्रत्येक देखावा आणि तिथले सर्व वातावरण एकदम जादू सारखं प्रत्यक्षात प्रकट होत.

  प्रत्येक शहराचा इतिहास, तिथल्या आवडी, निवडी ची सांगड इतकी छान लिहिली आहे हि मन एकदम भाराऊन जात.

  हा असला प्रवास वर वर पाहता इतका सोपा वाटतो. परंतु तो इतका सोपा नाही आहे हे प्रत्येक्षात वाचल्यावर कळले.

  जाण्याअगोदर ची तयारी , प्रत्येक देशातले तिथले नियम, लागणारे परवाने त्या साठी केलेली धडपड, तुम्ही फेसबुक वर केलेली कॅम्पेन पूर्ण प्रवासाचे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, बालगंधर्व नाट्य गृहातुन उदघाटन आणि सत्कार होऊन तुम्ही जो चित्त थरारक केलेला प्रवास आहे तो खरच अप्रतिम आहे. कुठून एवढी ऊर्जा तुझ्या शरीरात येते मित्रा ?

  खरच तू एक अजब रसायन आहेस आमच्या कॉलेजच्या बॅचचा.

  आपण शिकत असताना मला कधीही असं जाणवल नाही कि तुझ्यात असला एक शुद्ध साहित्यिक असेल.

  हे पुस्तक निसर्ग प्रेमी, ऐतिहासिक, निराशावादी, आशावादी , यांत्रिक आणि भौगोलिक रसिकांसाठी एक पर्वणीच आहे.

  प्रत्येक देखावा तू अशा पद्धतीने रंगवला आहेस कि पुढे काय होईल ह्याची उत्सुकता मनाला वाचताना जाणवते. आणि मग आपोआप एक एक पान पुढे सरकत जाते.

  हे पुस्तक आनंद, दुःख, विनोद, उत्सुकता , रोमांच, खळबळजनक , प्रेरणादायी, आणि उल्हसित करणारे, थोडंसं गोड, थोडंसं कडू, थोडंसं खारट, थोडंसं आंबट, थोडा तुरट असल्या चवीने भरले आहे.

  कट्टर वाचकांसाठी हि एक उत्कृष्ट कथा आणि गाथा पण आहे.

  पुस्तकातली सामग्री तर जोरदार आहेच आहे, परंतु त्याची सर्व रचना एकदम सर्वोत्तम आहे .

  मित्रा, तुझ्या ह्या नवीन लेखनाच्या प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐💐💐

  कृपया हा प्रवास अखंड चालू ठेव आणि असच इतरांना उत्साहित आणि प्रोत्साहित करत रहा.🙏

 9. Sameer Rajopadhye (verified owner)

  Satish, kalach Dreamers and Doers purna vachun zale. Kay bhannat experience ghetlay tumhi sarvani ani vachta vachta aamhi 😁😁 Pustak lihinyachi shaili itki jivant aahe ki vachtana ase vatayla lagle hote ki tuzya mage basun aapan hi safar kartoy. 🏍️🏍️ Tumhala aalele anubhav, bhetleli manse, bhinna bhinna prakarchi khadya sanskruti yane tumha sarvanche aaushyat anubhavanchi ek motthi shidori bharli aahe ani tyatil a ubhav vachtana angavar romanch uthtat. Ekunach lihunyachi. bhashechi bhatti ekdum chhan julun aali aahe.

  Hats off to you, your team, green vision team and your family members.

  Satish, we are proud of you.

 10. Sanjay Parkhi

  Good evening sir, पुस्तक वाचतो आहे.. खूपच सुंदर मांडणी केली आहे.. प्रस्तावना मध्ये लिहिल्या प्रमाणे खरोखर तुमच्या सोबत प्रवास करतो आहे अस वाटत आहे…

 11. नितीन तडवळकर

  नमस्कार. मी नितीन तडवळकर,
  परवा तुमचं पुस्तक हातात पडलं. मुखपृष्ठ पाहूनच खुष झालो. पुस्तक रात्री वाचायला घेतलं आणि २ वाजेपर्यंत वाचत होतो. निम्मं वाचून झालं. उरलेलं दुपारी संपवलं. तुमची भाषा आणि शैली खूप आवडली. प्रकरण २४ मात्र एकदम कलाटणी देऊन गेलं. तुमच्या लढाऊ वृत्तीला सलाम!
  खरंतर कालच लिहिणार होतो पण शब्दच सुचत नव्हते.
  अप्रतिम एवढंच म्हणीन.
  पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!

 12. Saee (verified owner)

  Great book, really enjoyed

 13. Muralidhar Deo

  प्रिय डॉ सतीलाल पाटील ,

  तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करण्याची संधी प्राप्त झाली . त्याबद्दल माझे दोन शब्द मनोगत व्यक्त करीत आहे. त्याचा स्वीकार करावा .

  पुस्तक वाचत असताना प्रथम मला हे कळाले नाही की मी हे पुस्तक एका शास्त्रज्ञाचे वाचत आहे की एका कला शाखेतून पदवी घेतलेल्या पदवीधराचे वाचत आहे. तुमचे भाषेवरचे प्रभुत्व हे तुच्या शास्त्रीय संशोधना इतकेच स्तुत्य आहे. आपण अनुभवलेले किंवा आपण पाहिलेले हे शब्दात व्यक्त करणे हे तितकेच आव्हानात्मक असते. परंतु तुम्ही ते इतके सुंदर वर्णन केले आहे कि वाचणाऱ्याला ते आपण स्वतः अनुभवत किंवा पहात आहोत असे वाटते. तुमच्या या शैलीबद्दल तुमचे अभिनंदन.

  तुमच्या पुस्तकातून तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रदर्शन होते. माणसाला काहीच अशक्य नाही हेच जाणवते. माणसाने स्वप्न पाहावीत व ती पूर्ण करण्याकरता स्वतःवर विश्वास ठेऊन परीश्रम केल्यास यश त्याला मिळतेच मिळते. एक गोष्ट मात्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या स्वप्नांबद्दल त्याचा प्रामाणिकपणा. आणि हाच प्रामाणिकपणा त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जात असतो. तुमचे हे पुस्तक नवीन पिढीकरता हे मार्गदर्शक व मनोबल वाढवणारे आहे. या पुस्तकातून पिढीला आपल्या स्वप्नांशी माणसाने कसे एकनिष्ठ राहावे व ते साध्य करण्याकरिता कसे परिश्रम करावेत याबद्दल प्रेरणादायी ठरेल याबद्दल शंकाच नाही.

  तुमच्या हातून अशीच उत्तमोत्तम पुस्तके आणखी येवोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना व तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.

  कळावे लोभ असावा.

 14. Vikram Tongaonkar (verified owner)

  शुक्रवारी रात्री पुस्तक हातात घेतले आणि शनिवारी संध्याकाळी वाचून पुर्ण केले.
  तुमची खुसखुशीत वाक्य पेरण्यांची शैली आवडली.
  परतीचा प्रवास बाईक वर करण्याचा निर्णय का घेतला?
  २४व्या प्रकरणा नंतर जे काही वाचलं त्यामुळे अंगावर काटा आला. इतक्या भीषण अपघाता नंतर फिनिक्स पक्षा सारखी परत उभारी घेतली आणि प्रवास पुर्ण केला! हे कल्पनाच करु शकत नाही….. इतका जिगरबाज माणूस पाहिला नाही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि इतकी खडतर मोहीम पूर्ण केल्याबद्दल कितीही वेळा अभिनंदन केले तरी कमीच आहे

 15. Amrun Kulkarni

  प्रति,
  ड्रीमर्स अँड डूअर्स

  खरतर तुम्ही पाठविलेले पुस्तक येऊन २ महिने झाले…पण अजून ते उघडले नव्हते, परवा जयदेव चा मेसेज आला अरे ते डॉ. सतीलाल पाटील यांचे पुस्तक वाचलेस का…उत्तर दिले नाही अजून, मनातल्या मनात कसे तरी वाटले इतके दिवस पुस्तक येऊन आपलेच दुर्लक्ष झाले… पुस्तकाची एक प्रत बरोबर ठेवली आणि संध्याकाळी घरी गेल्यावर म्हणले आता पुस्तक उघडून बसावे… पुस्तकाचे कव्हर पेज बघून आणि backpage वर दिग्गजांचे अभिप्राय वाचून पुस्तक वाचायला लगेच सुरु करूया असे झाले….श्री. उमेश झिरपे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली आणि ज्याप्रमाणे बुलेटला किक मारून accilarator फिरवत गाडीला गती मिळते तसे वाचनाचे झाले…पुस्तकाच्या सुरुवातीला तुमचे मनोगत आणि पुढे सुरु झालेली एक एक पुस्तकातील प्रकरणे अक्षरशः डोळ्यांना पुस्तकाशी बांधून ठेवत होती आणि मनाला तुमच्या सोबत तुमच्या गाडीवर मागे बसवून फिरवत होती.. पानावरील मजकूर प्रवासातील जिवंतपणा उभा करीत होते.. तुमचा गोव्यातून बुलेट प्रवास जसा सुरु झाला तसे आम्ही हि आमची वाचनाची बैठक पक्की केली आणि तुमच्यासोबत वाचनातून संपूर्ण प्रवास करू लागलो…

  लडाख मोहीम आणि नंतर सुरु झालेली सात देशांची ऐतिहासिक पुणे सिंगापूर पुणे मोहीम…या मोहिमेची तयारी, त्या तयारीत गुंतलेले तुमचे कुटुंबीय, सहकारी, मित्र मंडळी यांच्या सोबत आम्हीही वाचक म्हणून त्या तयारी पासूनच जोडले गेलो…बालगंधर्व मध्ये flagoff झाल्यावर जे तुमच्या गाडीच्या मागे बसलो तुम्ही हेल्मेटला लावलेला गो प्रो म्हणजे आमचे डोळेच आहेत कि काय इतका मोहिमेचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला मिळायला लागला…प्रत्येक गावातून पुढे जाताना तिथली भौगीलिक परिस्थिती, त्याचे ऐतिहासिक वर्णन आणि तिथले स्थानिक खाद्य पदार्थ हे सर्व वर्णन अंगावर रोमांच आणि जिभेवर पाणी आणत होते…

  ड्रीमर्स अँड डूअर्स या पुस्तकाला नेमके काय म्हणावे…हे एक प्रवास वर्णन आहे कि एखादे टीम वर्क आणि व्यवस्थापन कौशल्य शिकवणारे पुस्तक आहे कि जागतिक दर्जाचे प्रेरणादायी पुस्तक आहे… नाही नाही हे तर माणसाच्या संवेदनांना हात घालणारे ज्याला जे हवे ते सर्व (प्रवास वर्णन, टीम वर्क आणि व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणादायी) देणारे परिपूर्ण कल्पवृक्षासम कल्पपुस्तक आहे…

  पूर्ण प्रवासात तुम्ही आमचे (वाचकांचे) सारथ्य केलेत, पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात अत्यंत सोप्या, सूचक आणि साध्या वाक्यातून सारथी परंपरेला अनुसरून तुम्ही आम्हाला जीवनाचे सार देखील सांगत आलात…

  या पुस्तकाच्या निमित्ताने तुमच्या प्रवासातील “सकारात्मक तो” आमच्या “नकारात्मक त्याला” आयुष्याचा प्रवासात नेहमीच वरचढ ठरेल….केवळ ड्रीमर्स न राहता डूअर्स होण्यासाठी भाग पाडेल.

  खरतर नेमका काय अभिप्राय द्यावा किंवा पुस्तक वाचून काय वाटले हे केवळ एकदा सांगून अथवा लिहून होणार नाही…अनुभवाविण मान डोलवू नको रे या संत वचना प्रमाणे वारंवार प्रचीती घेणे आणि सकारात्मक तो दृढ करून त्याला स्थायीभाव बनविणे हे संयुक्तिक वाटते..

  तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

 16. Sagar D. Baviskar

  Hii everyone,
  Dreamers and Doers book is very nicely written by Dr.Satilal Patil Sir and I have read this book and Describes the travels and experiences of those seven countries (Pune-Singapore-Pune) in this book in a very nice way. When I was reading this book, I felt like I was traveling with this Dreamers and Doers team.
  Dr. Sir, it is certainly expected that you will fulfill such goals and dreams in the future.

 17. Mahipat Nalawade

  Good morning,
  Don’t have words to express feelings after reading *”Dreamers and Doers”*. I feel blessed and thankful 🙏
  Thank you.

 18. Prof. Namdeo Doke

  प्रवास आणि वाचन यामुळे माणसाला माणूसपण येतं आणि तो समृद्ध होतो. वाचनामुळे मानसाच्या मनाची खोली वाढते आणि प्रवासामुळे कक्षा रुंदावतात. या दोन्हीचा संगम जेथे होतो ते ठिकाण म्हणजे डॉ. सतीश पाटील. काल डॉ. सतीश पाटील यांचं ड्रिमर्स अँड डुअर्स पुस्तक हाती आलं आणि त्या पुस्तकानाचं माझ्याकडून त्याचं वाचन करून घेतलं. महत्वाच काम चालू असतानाही ते माझ्याकडून सोडवलं गेलं नाही एवढी ताकद त्यात आहे. अतिशय ओघवत्या भाषेतील प्रवास वर्णन वाचताना माझ्या नकळत मी स्वत: त्यांचा सहप्रवासी झालो. रोजच्या प्रवासचं वर्णन वाचताना तो प्रवास आपण स्वत: करतोय असचं वाटत राहत. रोजच्या प्रवासाचं वर्णन करताना कुठेही पुनरुक्ती झालेली नाही. अतिशय समर्पक शब्दात कोणताही बडेजाव न आणता लिहिलेलं हे प्रवास वर्णन जिद्द आणि चिकाटी याची जागोजागी प्रचीती देऊन जातं.
  सात देशांमधून झालेल्या प्रवासाने तेथील सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय जीवनाचे दर्शन या पुस्तकातून होते. मलेशिया आणि थायलंड मधून फिरताना सामाजिक जीवनातील मोकळेपणा आणि आर्थिक विकासाने निर्माण झालेल्या भिंती या दोन्ही जीवनाची तुलना करण्याची संधी या पुस्तकातून वाचकाला मिळते आणि त्यातून आपण कोणत्या प्रकारचं विकासाच प्रतिमान स्वीकारावं हा प्रश्न आपसूकच सोडवला जातो. खाद्य संस्कृती हा कोणत्याही समाजाचा आत्मा असतो. सतीश पाटलांनी भिन्न प्रदेशातील वेगवेगळे पदार्थ चाखताना त्यापदार्थाचे केलेलं अतिशय समर्पक वर्णन वाचकाला त्या पदार्थाच्या चवीची अनुभूती देऊन जातं. संपूर्ण पुस्तक वाचताना सतत पुढे काय झाल याची उत्कंठा वाढत जाते. जीवन का, कसे आणि कशासाठी जगावे हे सतीश पाटील यांच्याकडे पाहून शिकावं एवढ शिक्षण हे पुस्तक नक्कीच देऊन जातं. एवढा मोठा आघात होऊनही पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा अधिक शक्ती घेऊन उठावं आणि मोठी भरारी घ्यावी यातूनच हा माणूस किती अवलिया आहे याची प्रचीती येते. सतीश पाटील, जागृती पाटील, सई आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन.

 19. Prof. Dr. Sanjay Patil (verified owner)

  This book is not for Dreamers only but Doers also. It’s not only travel diary but life changing experience of book author Dr Satilal Patil (Satish), travelled from Pune to Singapore to Pune biking covered 20,000 km distance in 60 days crossing 7 countries. It’s true that road isn’t long when you have the right company…This book tells about the joy of discovery by 8 bikers who made their desires for adventure a reality … The author travelled with his 7 friends to Singapore on bike but solo returned back to Pune……. Book also reflects mouth watering cuisines of Thailand, Malaysia and Myanmar food…. Solo bikers meets so many new people regardless their destination … This solo journey gave more blend in with locals and nature… There is always one true inner voice what the author listened intimately and shared all in this book… Must read this book…Dreamers and Doers… Because this book talks a lot more about nature, adventure, culture, cuisine, and social and physical distinctness….And passion never Ends…. It’s endless journey…. Corona Pandemics Lockdown time leads more reading of such good books… All the best for next Pune to London journey.

 20. Sandhya Khodade

  हे पुस्तकं मला विशेष आवडलंय,अर्थात खूप रंजक बनवण्यापेक्षा माझ्यासारख्या bike चं थोडं फारच ज्ञान असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे कारण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची बारीक माहिती दिलीये. अगदी bike ने देशांच्या सीमा पार करण्यासाठी सुद्धा खास passport आणि विझा लागतो तो कसा काढायचा,तिथलं चलन असो किंवा तिथले petrol चे rate, bike चं लडाख stand,स्थानिक sim cards, network आणि हो विशेष म्हणजे भाषा कळत नसताना सुद्धा कसं तिथल्या स्थानिक लोकांशी जुळवून घ्यायचं,तिथलं स्थानिक जेवण मग ते octopus पासून किड्या मुंग्यानपर्यंत ची मेजवानी असो 😝किंवा grilled बेडूक असो… ऐकायला जरा वेगळं वाटतंय पण ज्या त्या देशाची खासियत शेवटी 😌
  आणि वाचताना bore होण्याचा प्रश्नच येत नाही कारण एखाद्या movie मध्ये जस सगळं सुरळीत चाललेलं असताना twist and turns येतात तशेच ह्या प्रवासात…!प्रवासाची एक बाजू खूप सुंदर असते आणि आपल्यालाच तिचं दिसते किंवा तिचं पहायला आवडते पण त्यासोबतच एक अशी बाजू असते ज्यात आव्हान, प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे patience पहिले जातात.
  बाकी Satish Patil सरांनी छान रंगवलंय…7 देश,58 दिवस आणि 20 हजार km ची ही सफर 😍. यातला मला आवडलेला भाग म्हणजे सिंगापुर ते पुणे केलेली solo ride….!
  -संध्या

 21. Asha Dahake

  “ड्रिमर्स अॅण्ड डुअर्स” या डॉ.सतीलाल(सतिष) पाटील यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ एवढे आकर्षक आहे की ते वाचायचा मोह आवरता येत नाही. त्यांचा मोटरसायकल सह समुद्रकिनारी रुबाबदार फोटो, वाळू चे वेगळे टेक्श्चर दाखवणारे अत्याधुनिक प्रिंटींग मनाला भुरळ पाडणारे आहे. आमचा मुलगा मनिष बाईकवेडा! त्या वेडापायी त्याने आपले नऊ दहा वर्षाचे स्थिरस्थावर करिअर सोडून दिले. व ठाणे येथे “मोटोरेंजर्स” हे अत्याधुनिक सुविधा असलेले मोठमोठ्या मोटरसायकल साठी रिपेअर, सर्विस सेंटर स्थापन केले. त्याचे मित्र त्याला बाईक पार्लर म्हणतात. कारण एकदा बाईक आत गेली कि नटून थटून, नवा साज लेवून बाहेर येते. तो स्वतः आपल्या पत्नीसह छोटी मोठी बाईक एक्सपिडीशन्स करत असतो. डॉ. सतिलाल यांचे पुस्तक मनिषला नक्कीच आवडेल व प्रेरणादायी ठरेल याची खात्री होती. मला स्वतःला वाचनाची गोडी व असे जिवंत अनुभव वाचायला खूप आवडतात. मग काय, पुस्तक आॅर्डर केले आणि नेहमीचा शिरस्ता सोडून मी धीर धरला व आधी मनिषला वाचायला दिले. त्याने तर कधी नव्हे ते भराभर वाचून संपवले व भारावलेल्या स्थितीत मला दिले.
  २० हजार किलोमीटर अंतराची आपल्या आठ सोबत्यांसह ही सात देशांची मोहीम अतिशय रोमहर्षक झाली आहे आणि डॉ.सतीलाल यांनी ती आपल्या नर्म विनोदी शैलीत शब्द बध्द केली आहे. फक्त बाईक राईड एके बाईक राईड न करता या सात देशांची मोहीम त्या त्या देशाच्या अर्थकारण,राजकारण, इतिहास, भूगोलासह अतिशय रंजक पद्धतीने आपल्या पुढे मांडली आहे. त्यात परतीचा सिंगापूर-भारत प्रवास एकटयाने करायचा निर्णय घेउन ‘कहानी मे ट्विस्ट’ आलेला आहे. परतीचा वाराणसी पर्यंतचा प्रवास सुखकर नसला तरीही सुखरूप पार पडतो आणि एका वळणावर एक जीव घेणा अपघात होतो. खर तर या अपघातातून बाहेर पडतांना आलेल्या अनेक शारिरीक व मानसिक व्याधींना समर्थपणे मुकाबला करत लेखक कसे बाहेर पडले हे खूप सुंदर व प्रेरणादायी ठरले आहे. हा या पुस्तकाचा उत्कर्ष बिंदू आहे आणि तो सर्वांनी वाचावा असा सल्ला आहे. जीवनात चढ उतार येतातच पण आपण समर्पक रितीने सामोरे जावून त्यातून बाहेर यावे हा अतिशय प्रभावशाली (Potent) संदेश लेखक यातून देतात. वाचा आणि अनुभव जरूर घ्या.

 22. Bhaskar Padul

  प्रिय सतीशराव
  मी तिसऱ्यांदा ड्रीमर्स आणि डूअर्स वाचतो पण मन भरत नाही। जिद्द काय असते। माणूस किती ध्येयवेडा असतो हे पण शिकायला मिळालं। 7देश 58 दिवस आणि 20हजार किमी तेही बुलेटवर वा मित्रा। प्रवासात वेगळे देश त्यांची संस्कृती, एकदम उष्ण 40℃ तर कधी एकदम थंड अगदी 0℃ च्या खाली। खानपान वेगळे। खूप काही अनुभव मांडले। वाचताना असे वाटते आम्ही प्रवासात आहेत एव्हडे सहज लिखाण।वाचताना त्रास झाला तो नियतीच्या क्रूर प्रहार या लेखाचा। पण अपघात होऊनही तिथूनच तो प्रवास पूर्ण करणे काय जिद्द याला काय म्हणावे। आणि सलाम त्या मित्राला जो कृष्णासारखा धावून आला नाव पण मोहन च । खूप अभिमान वाटतो तुमच्यासारखा आणि मोहनराव सारखे मित्र मिळाले। आमचे सर्वच अधुरे राहिले। पण वाटत अजून काहीतरी राहील काहीतरी मिस झालं का?म्हणून तिसऱ्यांदा वाचत आहे। सध्या मलेशियन राजवाड्यावर पोहचलो।
  खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी एकदातरी नक्की वाचा। आयुष्यातले महत्वाचे क्षण यात टिपले माझ्या मित्राने।

 23. Rohit Kanade

  एखादी गोष्ट जो पर्यंत आपल्याला मिळत नाही तो पर्यंत आपण तिला मिळवण्यासाठी धडपडत राहतो. त्या गोष्टीबद्दलची ओढ तीव्र होत जाते आणि ती मिळवण्यासाठी आपली धडपड आणखीनच वाढत जाते. गोष्ट मिळवल्यानंतर होणारा आनंद, हा स्वर्ग सुखाहूनही मोठा असतो. अतिशय सुंदर असा अनुभव हा या ड्रीमर्स अँड डुअर्स पुस्तकामधून अनुभवायला मिळाला.
  – रोहित कानडे

 24. Anuj Gaikwad

  जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते,
  तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते,
  भले यशस्वी होण्याची खात्री नसेल… परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.
  आणि Dreamers and doers हे नक्कीच असे पुस्तक ठरू शकते

  • Satilal Patil (verified owner)

   हॅलो अनुज,
   नमस्कार,
   ड्रीमर अँड डूअर्स या पुस्तकाबद्दलच्या आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुणे सिंगापूर पुणे या मोहिमेतून मला आलेले अनुभव वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केले आहेत. आपल्याला पर्यंत ते पोहोचले हे वाचून छान वाटले.

   हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेझॉन वर आपला अभिप्राय नोंदवावा आणि फेसबुक वरून आपले अनुभव इतरांशी शेअर करावे ही विनंती.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!