drsatilalpatil आणि मी सह्याजीराव झालो !

आणि मी सह्याजीराव झालो !

आणि मी सह्याजीराव झालो ! post thumbnail image

लहानपणी वळणदार स्वाक्षरी करायचा छंदच जडला होता. मोठ्ठा क्रिकेटपटू झाल्यावर लोकं आपली स्वाक्षरी घेण्यासाठी डायऱ्या पुढे करतील, त्यासाठी आपल्याला फर्राटेदार सही जमलीच पाहिजे त्यासाठी हा खटाटोप.  पुढे नोकरीला लागल्यावर कंपनीच्या प्रिंसिपल सर्टिफिकेट वर सही करण्यासाठी मला ‘पॉवर ऑफ एटरनी’ म्हणजे कुलमुखत्यार पत्र देण्यात आलं. दीड दोनशे पानांच्या त्या रंगीबेरंगी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर सह्या करतांना गंमत वाटायची. मी मैदानात शतक ठोकून आलोय आणि माझे चाहते सहीसाठी गर्दी करताहेत अशा अविर्भावात त्या कार्यालयीन रजिस्टर वर सह्या ठोकायचो. पडद्या वरील चित्रपट पाहतांना कसं आपण कल्पनाशक्तीने हिरोला बाजूला सारून स्वतः घुसतो, अगदी तसाच फील ह्या सह्या करतांना यायचा. 

परवा ‘ड्रीमर्स अँड डुअर्स’ पुस्तकाची प्रथम आवृत्ती हातात पडली. प्रकाशनपूर्व बुकिंग ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पुस्तक छापून येण्याअगोदर सत्तर टक्के पुस्तके बुक झाली होती. पण ह्या सर्वांचा एक आग्रह होता. आम्हाला तुमच्या सहीनिशी पुस्तक हवंय. मग काय घेतली लेखणी आणि लावली पुस्तकाला. मैदानात शतक ठोकून आल्याचा फील घेत, चाहत्यांच्या डायऱ्यांचा स्वीकार करत सही ठोकू लागलो. सहीच्या फर्राट्यानिशी स्क्वेअर कट, ऑन ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, पूल, हुक बाहेर पडू लागले.

पहिल्या ५०-१०० सह्या करतांना मजा आली. नंतर मात्र अजून किती पुस्तक बाकी आहेत हे परत परत तपासू लागलो. तीन साडेतीन तासाच्या तपश्चर्ये नंतर सातशे प्रतींवर सह्या ठोकून झाल्या. ‘पुस्तक कधी पाठवताय ? दिवाळीच्या सुट्टीत पुस्तक वाचून संपवायचंय’ अशी विचारणा काहीजणांकडून होत होती. वाचकांना ह्या स्वाक्षरी मोहिमेमुळे काही तासांचा पुस्तक विरह झाला खरा पण या खटाटोपात अश्या प्रकारे मी ‘सह्याजीराव’ झालो.    

https://www.facebook.com/Dreamers-and-Doers-107592047788358

10 thoughts on “आणि मी सह्याजीराव झालो !”

  1. प्रिय सतीशजी,
    सस्नेह नमस्कार आणि धन्यवाद .
    आपण विनयकडे पाठवलेली DREAMERS & DOERS पुस्तकाची प्रत मिळाली.
    काल दिवसभराची सुट्टी सार्थकी लागली.संपूर्ण पुस्तक वाचलं,अनुभवलं .
    श्री.ना.पेंडसेंची अजरामर साहित्य कलाकृती गारंबीचा बापू वाचताना जी अनुभुती येते तीच अनुभुती पुन्हा मिळाली. हर्णे बंदरानजीक असलेले गारंबी गाव, तिथला जिंदादिल बापू, आणा खोत,मायाळू राधा,विठोबा,
    पुलाजवळचा हॉटेलवाला बायजी .सारी काल्पनिक पात्र जिवंत होऊन अवती भवती फिरू लागतात .
    अगदी तसेच,
    तुमच्या पुस्तकातील अस्सल पात्र,अगदी सुरुवातीपासून म्हणजेच कर्नाटक होसपेट मधील श्रीनिवास वेणुपल्ली,रेवा येथे ४० फुटाचा स्वागताचा भव्य बॅनर लावणारे श्रीयुत सोनजी,अमरावती मधील भल्या पहाटे दाल बाटीचे ग्रँड डिनर देणारा पवन आणि त्यांचा परिवार.
    सावजी चिकन -चपातीचा डब्बा आणणारा नागपूर मधील मित्र सुनील भोईर ,पुढे रांचीमधील बुलेट
    शोरूमचे मालक अभिषेक सिंग ते अगदी भूतान नजीक भेटलेले ,बायकिंग ब्रदरहूड रोमरोमात
    भिनलेले नॉर्थ-ईस्ट बायकर्स असोसिएशनचे पदाधिकारी श्री. रणबीर ,भूतानमधील नागाम्यांल दोरजे,
    गुवाहाटी मधील किकी हासल्लू आणि तिचा परिवार.
    सेकमाईची रंगतदार पार्टी देणारा इम्फाळ मधील विवेक राज आणि मित्र परिवार,बुलेट शोरूमचा मालक खोमा ,
    सिंगापूर ते भारत पदभ्रमणावर चाललेला डॅनिअल लिम ( डॅनी वॉकर ) आणि सगळ्यात जास्त भावलेली म्हणजेच,भारत भेटी साठी आतुरलेली पेणांग मधील प्रेमळ सेल्वी ,
    कालालंपूर मधील मित्र कौस्तुभ, थायलंड मधे भाषेचा कोणताही अडसर न येऊन देता मदत करणारा फांग आणि तिमोन परिवार,
    परतीच्या प्रवासात वाराणसी झालेल्या अपघातात मदत करणारा देवदूत संतोष सरोज ,स्थानिक मित्र
    राजेश सिंग .
    ही सगळी मंडळी तुमच्या मोहिमेचा एक भागच बनून DREAMERS & DOERS चे खरे शिलेदार बनतात .
    येताना चांदवडला मेजवानी देणारे बाळासाहेब व्यवहारे, नाशिक येथे मुकाम्माची आणि न्याहारीची सोय करणारे अविनाश बारगळ, आळेफाटा येथे मासवडीचा रस्सा,भाकरी आणि इंद्रायणीच्या मऊ भाताचे जेवण प्रेमाने खाऊ घालणारी विनयची आई .
    नितळपणे माणुसकीचा तळ दाखवणारी ही माणसं आपल्या पुस्तकातून मनाला भावून जातात हेच
    आपल्यातील लेखकाचे यश आहे.
    आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सौ जागृती वाहिनी यांचे पाठबळ .DREAMERS & DOERS आणि GO GREEN & GO CLEAN या दोन्ही टीमचे विशेष अभिनंदन.

  2. प्रिय सतीश,

    १० नोव्हेंबर २०२० ला संध्याकाळी एक लिंक येते व्हाट्स अप वर *ड्रीमर्स अँड डूअर्से* 📖ह्या पुस्तकाची.

    लेखक डॉक्टर सतीलाल (*सतीश*) पाटील (आमचा *सत्या* ) !!

    नाव वाचून मी लगेच गुगल पे 💲 करून पुस्तक आरक्षित केल.

    व्हाट्स अप वर दिलेल्या नियमाप्रमाणे पुस्तक २२ नोव्हेंबर ला माझ्या घरी कुरियर ने आल.

    एक दिवस ते पुस्तक तसच टेबलावर होत आणि मग २४ नोव्हेंबर ला मी त्याला वाचायला सुरुवात केली.

    मित्रा मी एकदम *भारावून च* गेलो. आणि काही तरी लिहावं ✍️असं वाटायला लागल आणि माझे हात शिवशिवायला लागले तुझ्या सारखं एव्हडं शास्त्र शुद्ध तर मला नाही लिहिता येणार परंतु थोडा प्रयत्न करून *थोडे लिखाण* करतो आहे.

    तू जे काही लिखाण ह्या पुस्तकाद्वारे केले आहे ते इतके सुंदर आणि अफलातून असेल हे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

    मी आता पर्यंत बऱ्याच लेखकांची लिखाण वाचली आहेत जसे रणजित देसाई , पु. ल. देशपांडे , प्र. के. अत्रे, वि. दा. सावरकर, शिवाजी सावंत, शांता शेळके, राम गडकरी, वीणा गवाणकर, अच्युत गोडबोले, इ.

    मला वाचताना प्रकर्षणाने असं जाणवल कि हे एका *शास्त्र शुद्ध लेखकाने* लिहिलेले पुस्तक आहे.

    आणि खरं सांगू मला तुझा हेवा वाटला.

    पुस्तकातले प्रत्येक पाठ हा एवढ्या सुंदर 👌आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने रचला आहे कि वाचताना प्रत्येक देखावा आणि तिथले सर्व वातावरण एकदम जादू सारखं प्रत्यक्षात प्रकट होत.

    प्रत्येक शहराचा इतिहास, तिथल्या आवडी, निवडी ची सांगड इतकी छान लिहिली आहे हि मन एकदम भाराऊन जात.

    हा असला प्रवास वर वर पाहता इतका सोपा वाटतो. परंतु तो इतका *सोपा नाही* आहे हे प्रत्येक्षात वाचल्यावर कळले.

    जाण्याअगोदर ची तयारी , प्रत्येक देशातले तिथले नियम, लागणारे परवाने त्या साठी केलेली धडपड, तुम्ही फेसबुक वर केलेली कॅम्पेन पूर्ण प्रवासाचे पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, बालगंधर्व नाट्य गृहातुन उदघाटन आणि सत्कार होऊन तुम्ही जो चित्त थरारक केलेला प्रवास आहे तो खरच अप्रतिम आहे. कुठून एवढी ऊर्जा तुझ्या शरीरात येते मित्रा ?

    खरच तू एक अजब रसायन आहेस आमच्या कॉलेजच्या बॅचचा.

    आपण शिकत असताना मला कधीही असं जाणवल नाही कि तुझ्यात असला एक शुद्ध साहित्यिक असेल.

    हे पुस्तक निसर्ग प्रेमी, ऐतिहासिक, निराशावादी, आशावादी , यांत्रिक आणि भौगोलिक रसिकांसाठी एक पर्वणीच आहे.

    प्रत्येक देखावा तू अशा पद्धतीने रंगवला आहेस कि *पुढे काय होईल* ह्याची उत्सुकता मनाला वाचताना जाणवते. आणि मग आपोआप एक एक पान पुढे सरकत जाते.

    हे पुस्तक आनंद, दुःख, विनोद, उत्सुकता , रोमांच, खळबळजनक , प्रेरणादायी, आणि उल्हसित करणारे, थोडंसं गोड, थोडंसं कडू, थोडंसं खारट, थोडंसं आंबट, थोडा तुरट असल्या चवीने भरले आहे.

    कट्टर वाचकांसाठी हि एक उत्कृष्ट *कथा आणि गाथा* पण आहे.

    पुस्तकातली सामग्री तर जोरदार आहेच आहे, परंतु त्याची सर्व रचना एकदम *सर्वोत्तम* आहे .

    मित्रा, तुझ्या ह्या नवीन *लेखनाच्या प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा* !!! 💐💐💐

    कृपया हा प्रवास अखंड चालू ठेव आणि असच इतरांना *उत्साहित आणि प्रोत्साहित* करत रहा.🙏

  3. प्रतिक्रिया जीवन एक कसौटी 10वी असताना हिंदी स्थूल वाचन विभागातील एक धडा होता. तुझ्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून पुस्तकां बद्दल एक अनामिक ओढ झालीय. आणि त्यानिमित्ताने काही राहून गेलेला सतीलाल अनुभवायची संधी या पुस्तकातून मिळतेय .आता पुढील प्रतिक्रिया पुस्तक वाचल्या नंतर

  4. खूप मस्त लिहले गेले आहे।।।।
    मला स्वतः biking केल्या चा अनुभव आला

  5. प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे/महाराष्ट्र/भारत says:

    आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा
    ” लाल ”

    काही दिवसांपूर्वी
    ” डॉ सतिश पाटील ”
    झाले.

    आणि आता
    ” उत्तम लेखक ”
    झाले.

    त्यांच्या या जिवनाच्या प्रवासा बरोबरच
    जगाच्या प्रवासामुळे
    माझे मन ओथंबून वाहत आहे.

    मला त्यांच्या
    ” सार्थ अभिमान ”
    आहे.

Leave a Reply to Prafulla Walhe Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भाग- २३. रेन! रेन! गो अवेभाग- २३. रेन! रेन! गो अवे

अंगकोरवाट म्हणजेच कंबोडियाच्या सांस्कृतिक राजधानीतून सायकलिंग करत आम्ही थायलंडमध्ये प्रवेश केला होता. उत्तर थायलंडच्या रॅनॉन्ग या शहरात आम्ही पोहोचलो. दिवसभरच्या पायडलपीटीने जरा दमछाक झाली होती. संध्याकाळची वेळ होती. शॉवर घेतला

तणनाशकानं जाळलं कंबोडियासारख्या देशांचं भविष्यतणनाशकानं जाळलं कंबोडियासारख्या देशांचं भविष्य

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पोलपॉटने बरबाद केलेल्या देशात बाईकने फिरतांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवताहेत. व्हिएतनाम युध्दमुळे त्यांच्या देशाचं

पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारकपी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बाजारात पीएच बॅलन्सर म्हणजे सामू सुधारक उत्पादनांची भरमार दिसते. पण हे सामू सुधारक म्हणजे