drsatilalpatil ……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो. post thumbnail image

धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या सीमेला जोडणारा तो पूल होता. नदीच्या  पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम लोखंडी पट्ट्याची भिंत. एखाद्या लोखंडी बोगद्यात बाईक चालवायचा फिल येतोय. 

भारत-सिंगापूर-भारत अशा २० हजार किलोमिटरच्या बुलेट मोहिमेदरम्यानच्या प्रवासात आम्ही या आंतरराष्ट्रीय सीमेवर  येऊन  पोहोचलो  होतो. या पुलाला ‘भारत म्यानमार मैत्री  पूल’ असं नाव आहे. दोन्ही  देशांच्या  सीमांना सांधत हा पोलादी मैत्रीचा दुवा उभा आहे.

‘म्यानमारमध्ये आपलं स्वागत आहे’ असं म्हणत पिवळ्या सरकारी बोर्डाने आमचं स्वागत केलं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गोल चेहऱ्याच्या म्यानमारी सैनिकाने आमच्या  बाईककडे त्याच्या  बारीक नजरेनं निरखून पाहिलं. अगोदरच  बारीक असलेले त्याचे डोळे बिना चष्म्याचा वाचायचा प्रयत्न करणाऱ्या चष्मेबहाद्दरा सारखे वाटत होते. पुढे ‘उजव्या बाजूला गाडी चालवा’ अशी पाटी दिसली आणि डोक्यात प्रकाश पडला. अरे इथं उजवीकडे बाईक चालवायचीय. आयुष्यभर धुत्या हाताला गाडी चालवणाऱ्या आम्हा बाईकर्सला आता खात्या हाताला गाडी  चालवावी लागणार होती.

बॉर्डरवरचे सरकारी  सोपस्कार आवरून रस्त्याला लागलो. आयुष्यभर  दारूच्या व्यसनाला चिकटलेल्या दारुड्याने दारू सोडल्यावरसुद्धा त्याची पावले गुत्त्याकडे आपोआपच वळावी तसेच आमच्या वामांगी बाईकर्सच्या बाईकची चाके डावीकडे ओढली जात होती. मग समोरून  येणारं वाहन आम्हाला आमची जागा दाखवून देत,हॉर्नारव करत निघून जात होतं. तो ड्रायव्हर कदाचित म्यानमारी भाषेत शिवीही हाणत असेल, पण आम्हाला त्याची भाषा कळत नव्हती आणि बाइक आणि ट्रकच्या आवाजात काही ऐकूही येत नव्हतं, त्यामुळे त्याचे ओठ आमच्या प्रशंसेत हालताहेत अशी समजूत करून घेत पुढे निघालो. म्यानमारी शिव्या आमच्या ओव्या झाल्या होत्या. 

रस्त्यावर अजून एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे म्यानमारमध्ये उजवीकडे आणि डावीकडे  स्टिअरिंग असलेली वाहनं दिसतात. रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवण्याचा नियम असणाऱ्या देशात डावीकडे ड्रायव्हिंग सीटची वाहने कशी, हा प्रश्न पडला. पण खोदून काढल्यावर मनोरंजक माहिती समोर आली.

या देशाला १९४८ मध्ये इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं आणि नामांतराच्या लाटेत ते बर्माचं म्यानमार झालं. १९७० पर्यंत इथं भारतासारखी रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहनं चालायची. पण १९७० मध्ये सत्तेवर आलेल्या ‘जनरल वीन ने’ ला उपरती झाली आणि त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन संपूर्ण देशात रस्त्याच्या उजवीकडून वाहनं चालवायचा वटहुकूम काढला. इथे मिलीट्रीराज असल्याने त्याची अंमलबजावणीही त्वरित झाली. ‘वीन ने’ साहेब या खात्या-हाताला वाहनं चालवायच्या कल्पनेमागे हात धुवून का लागले, याबाबतच्या काही आख्यायिका आहेत. काहींच्या मते साहेबांच्या बायकोला ज्योतिष शास्त्राची आवड होती. आणि उजवं ट्राफिक देशाच्या भविष्यासाठी उजवं ठरेल असं तिचं ज्योतिषशास्त्र सांगत होतं. पण काहींच्या मते जनरल  साहेबांना एके दिवशी स्वप्न पडलं आणि  त्यनुसार त्यांनी हा निर्णय घेतला. आख्यायिका काहीही असोत, पण या निर्णयाने म्यानमारी लोकांची आणि वाहनं निर्माण करणाऱ्या कंपन्यांची झोप उडाली होती…. ट्राफिकचा गोंधळ होऊ लागला. जुनी वाहनं डावी आणि नवी उजवी असा डाव्या-उजव्याचा संसदेप्रमाणे गोंधळ सुरू झाला. डाव्या-उजव्यांच्या या रस्त्यावर आम्ही उजव्यांच्या पक्षात टिकून राहायचा प्रयत्न करत  होतो,  पण स्वभावधर्मानुसार काही बाइकर अजाणता डावीकडे पक्षांतर करायचे तर काहीजण अपक्षाच्या मध्यम मार्गाकडे कलायचे. अशा वेळी योग्य मार्गावरील वर्तमानात बाईक चालवणाऱ्या बाईकरने ओरडून किंवा हॉर्न वाजवून त्यांना स्वपक्षात परत आणून परिस्थितीची जाणीव करून द्यायची. २-३ दिवसांच्या म्यानमारी सरावाने मात्र उजवीकडचं बाईकिंग जमू लागलं.………पण अशा  पद्धतीने आयुष्यभर वाममार्गाने चालणारे पापभिरू बाईकर्स या मार्गावरून ढळले होते !

contact@drsatilalpatil.com

www.drsatilalpatil.com

This image has an empty alt attribute; its file name is image-150x300.png

4 thoughts on “……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.”

  1. Very nice ,I am in uganda now ,just waiting to reach india buy this and read ,yes also trying to buy online bcz one of my friend who is in gujrat for holidays, he is coming back .let ne whether I will succeed.

    I have followed your very post on FC during your trip.

    Thank you

    Mahendra Godse

      1. उत्कंठावर्धक थरार भय मज्जा अभ्यासू अनेक पैलुंनी भरलेले प्रवास वर्णन अतिशय वाखाणव्या जोगे आहे
        तुझ्याकडून हे शब्द बद्रय होणे मला फारच आनंद देऊन गेले पण मी अजुन पूर्ण पूस्तक वाचु शकलो नाही मी वाचणारच
        अनेक शुभाशिंर्वाद

  2. थक्क करणारा,उत्कंठावर्धक थरार भय मज्जा अभ्यासू अनेक पैलुंनी ओतपोत भरलेला प्रवास वर्णन अतिशय वाखाणव्या जोगे आहे
    तुझ्या कडुन हे शब्द बद्रय होणे मला फारच आनंद देऊन गेले पण मी अजुन पूर्णपूस्तक वाचु शकलो नाही मी वाचणारच
    अनेक शुभाशिर्वाद

Leave a Reply to Anil Nikumbhe Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भाग-१: तंटा(मुक्ती)भाग-१: तंटा(मुक्ती)

भाग-१: तंटा(मुक्ती) कथा-१… भारत आणि पाकिस्थांची फाळणी झाली. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या भावाभावांची ताटातूट व्हावी तसा, एक देश दोन भागात विभागाला गेला. फोडा आणि राज्य करा ही नीतीला बळी

देशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाटदेशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भगवान विष्णूच्या या देशात मी आणि माझी बाईक फिरतोय. ‘अंगकोर वाट’ मंदिराचं दर्शन घेतल्यापासून,

भाग २६. जोडल्याने  होत आहे रे !भाग २६. जोडल्याने  होत आहे रे !

या आठवड्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स रिसर्च प्रयोगशाळेत, संशोधकांनी सकारात्मक बातमी दिली. त्यांनी घोषित केलं की त्यांनी अणूंची  एकत्रीकरण अभिक्रिया यशस्वी केली असून त्यातून त्यांना जास्तीची ऊर्जा मिळाली. या बातमीने